Bicycle Stand On a Vehicle Dainik Gomantak
गोवा

वाहनावर सायकल स्टँड लावणे बेकायदेशीर

राज्यात चारचाकी वाहनाच्या मागे सायकल स्टँड लावणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात चारचाकी वाहनाच्या मागे सायकल स्टँड लावणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. वाहनांसाठी धोकादायक असल्याच्या नियम 184 खाली कारवाई करता येते. मात्र, त्याविरुद्ध आजपर्यंत वाहतूक अधिकारी वा वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. अशा वाहनाच्या मागाहून दुचाकीची धडक बसली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(It is illegal to mount a bicycle stand on a vehicle)

गेल्या काही दिवसांपासून अनेकजण शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकल चालवू लागले आहेत. मात्र ही सायकल चारचाकी वाहनाला मागे स्टँडला अडकवून मोकळ्या ठिकाणी जाऊन त्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र त्यानंतर हा लावलेला सायकल स्टँड वाहनाला तशाच ठेवला जातो. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही परवानगीशिवाय असे प्रकार करता येत नाहीत मात्र सर्रासपणे त्याचा वापर होऊनही वाहतूक अधिकारी व वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.

काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. हे सायकल स्टँड अपघातावेळी कोणाच्याही जिवावर बेतू शकतात त्यामुळे त्याविरुद्ध कारवाई होणे आवश्‍यक आहे असे मत काही दुचाकीचालकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या कारवाईबाबत वाहतूक खात्याचे अधिकारी तसेच वाहतूक पोलिस अधिकारी गंभीर नसल्यानेच या चारचाकी वाहन चालकांचे फावले आहे. अनेकदा ही वाहने शहारातील रस्त्यावर पार्किंगसाठी उभी केली जातात तेव्हा मागील बाजूने असलेला हा सायकल स्टँड रस्त्याने जाणाऱ्या वाहनांसाठी अडचणीचा ठरत आहे.

वाहनाविरुद्ध कारवाईच्या सूचना

चारचाकी वाहनाला वाहतूक खात्याच्या परवानगीशिवाय त्यात बदल करणे कायद्यानुसार बेकादेशीर आहे. त्याच्या उल्लंघनप्रकरणी कलम 184 (धोकादायक) कारवाई करता येते. तरीही कायद्यात आणखी दुसऱ्या नियमाची तरतूद आहे का ती तपासण्यात येत आहे. खात्याच्या वाहतूक निरीक्षकांना अशा वाहनांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना केल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT