पणजी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी वेळ लागत असल्याने निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दहावीच्या(10th) विद्यार्थ्यांचे(Students) गुण एकत्र करून ते सादर करण्यासाठी सीबीएसईने शाळांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निकालासाठी(Result) विद्यार्थ्यांना जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.(Is it CBSE 10th results in July)
राज्यात दोन नवोदय विद्यालये, केंद्रीय विद्यालये व इतर काही विद्यालये सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार चालतात. सीबीएसईकडून शाळांना अंतर्गत मूल्यमापन करून निकाल तयार करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निकाल लांबणीवर पडणार आहे. शिवाय सीबीएसईने एक परिपत्रक जारी करून 20 जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळेच आपल्या शाळांना अंतर्गत मूल्यमापन करून त्यासाठीचा निकाल तयार करून तो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी 25 दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. आता शाळा 30 जूनपर्यंत सीबीएसईकडूनकडे निकाल पाठवू शकतात. त्यानंतरच निकाल जाहीर केला होणार आहे. शाळांना निकाल पाठविल्यानंतर बोर्डाकडून तो जाहीर होण्यास पाच ते सात दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास जुलै उजाडण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.