Revolutionary Goans | Manoj Parab
Revolutionary Goans | Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: हाच का सत्तरीतील खरा विकास? मनोज परब यांची राणेंच्या घराणेशाहीवर टीका...

Akshay Nirmale

Manoj Parab vs Rane Family: गोव्यात गेल्या काही दिवसांत रिव्होल्युशनरी गोवन्सचे संस्थापक मनोज परब आणि पर्ये येथील आमदार देविया राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आहे. परब यांची म्हादईसाठीची पदयात्रा अडवल्यानंतर परब आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता पर्ये-सत्तरीतील फोटो ट्विट करत राणे कुटूंबावर निशाणा साधला आहे.

परब यांनी पर्ये-सत्तरी येथील सावंतवाडा परिसरातील काही छायाचित्रे ट्विटवरून शेअर केली आहेत. या फोटोजमध्ये तेथील पाण्याची समस्या दिसून येत आहे. या फोटोमध्ये टँकरमधून आलेले पाणी पाईपने बॅरेलमध्ये साठवून घेताना महिला दिसत आहेत.

या फोटोतून सत्तरीतील खरा विकास दिसतो. हा विकास टँकरमधून पाईपद्वारे बॅरेलमध्ये येतो. ५० वर्षे राणे कुटूंबीयांची येथे सत्ता आहे. पण आता लोक पाण्यासाठी, हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. हुकुमशाही आणि घराणेशाहीने सत्तरीतील लोकांचे जीवन नरकमय केले आहे, असे परब यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

परब यांनी या ट्विटमध्ये मंत्री आणि सत्तरीचे आमदार विश्वजीत राणे आणि पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांना टॅग केले आहे. दरम्यान, पर्ये आणि सत्तरी हे दोन्ही मतदारसंघ राणे कुटूंबियांचा बालेकिल्ला मानला जातो.

सत्तरी तालुक्यात वाळपई, पर्ये मतदारसंघांत मिळून विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ने दहा हजार मते घेतली होती. म्हणूनच येथून पदयात्रा सुरू केली. पण याला राजकीय वळण देत काहींनी पदयात्रा रोखली. पण आम्ही मागे हटणार नाही.

सत्तरी तालुका कुणाच्या बापाचा नाही, असे मनोज परब यांनी म्हटले होते. त्यानंतर म्हादईसाठी पदयात्रेची सुरवात सत्तरीतूनच का? याच्यामागे राजकारण आहे. या पदयात्रेत बाहेरून लोक आणले, असे आमदार देविया राणे म्हटल्या होत्या.

मनोज परब यांनी टूगेदर फॉर म्हादई मुव्हमेंट या नावाखाली 20 फेब्रुवारीला पदयात्रा सत्तरीतून सुरू केली. पण टूगेदर फॉर म्हदई मुव्हमेंट अंतर्गत कोणतीच पदयात्रा, धरणे काढता येणार नसल्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढत पुढील 60 दिवसांसाठी 144 कलम लागू केले.

म्हादई नदीला ज्या तालुक्यातून सुरूवात होते तिथून सुरवात केली तर सरकारला आक्षेप कशासाठी वाटतो? असा सवाल परब यांनी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT