Goa Recruitment Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीयांची नोकरभरती कायमस्वरुपी की हंगामी?

गोव्यात आतापर्यंत झालेल्या जिल्हा पंचायत तसेच पालिका निवडणुकाच्या काळात सरकारने 10 हजार नोकऱ्यांचे आमिष दाखवून भाजपने सत्ता मिळवण्यात यश मिळवले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आतापर्यंत झालेल्या जिल्हा पंचायत तसेच पालिका निवडणुकाच्या काळात सरकारने 10 हजार नोकऱ्यांचे आमिष दाखवून भाजपने सत्ता मिळवण्यात यश मिळवले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही सध्या सरकारी खात्यामध्ये नोकरभरती प्रक्रिया जोरात सुरू आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वीच सरकारने सरकारी खात्यातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील रिक्त पदे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत (GHRDC) भरण्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे सध्या सुरू असलेल्या नोकरभरतीबाबत युवांमध्ये सरकारी नोकऱ्या कायमस्वरुपी की हंगामी पद्धतीवर असा संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात विविध खात्यात गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत सुरक्षा कर्मचारी म्हणून वर्णी लावली गेली आहे. आता लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पर्सनल असिस्टंट (स्टेनो व सेक्रेटरी), मल्टीटास्किंग स्टाफ (मेसेंजर, ऑफिस बॉय व ड्रायव्हर), ज्युनियर ऑफिस असिस्टंट ही पदे आता या महामंडळामार्फत भरण्यात येणार आहेत, या संदर्भातील आदेश हल्लीच सरकारने काढला आहे. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत सराकारी खात्यातील विविध क व ड वर्गातील पदे खात्याने पाठवलेल्या प्रस्तावानुसार भरली जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या विविध सरकारी खात्यामध्ये जी नोकरभरती सुरू आहे त्याचे भवितव्य काय? असा प्रश्‍न सध्या गेली अनेक वर्षे सरकारी नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील युवांमध्ये उपस्थित केला जात आहे.

...म्‍हणून झाली चलबिचल!

आगामी विधानसभेच्या तोंडावर काही महिने असतानाच सरकारी आतापर्यंत आठ हजार नोकऱ्यांच्या जाहिराती दिल्या आहेत. तसेच दोन हजार नोकऱ्यांसाठी जाहिराती देण्यात येत आहेत. विविध खात्यामार्फत ही नोकरभरती सुरू आहेत. पोलिस व अग्निशमन दलात शारीरिक चाचणी सुरू आहेत. इतर काही खात्यांमध्ये लेखी परीक्षा दर रविवारी सुट्टीच्या दिवशी घेतल्या जात आहेत. अनेक युवांनी सरकारी नोकरीच्या आशेने विविध खात्यात अर्ज सादर करून या चाचण्या तसेच लेखी परीक्षेला उपस्थित राहत आहेत. कायमस्वरुपी सरकारी नोकरी मिळेल, या आशेवर हे युवा आपले नशीब आजमावत आहेत. मात्र, सरकारने हल्लीच रिक्त पदांवर महामंडळामार्फत उमेदवारांची वर्णी लावली जाईल, असे उघड केल्याने युवांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

विविध खात्यामार्फत सुरू असलेली कायमस्वरुपी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू आहे. जो आदेश काढण्यात आला आहे तो सध्या नव्याने भरण्यात येत असलेल्या नोकरभरतीशी संबंध नाही. ज्या खात्यामध्ये सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे कामात अडथळा येतो त्‍या ठिकाणी गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत कामाच्या पदानुसार त्यांच्या यादीत असलेल्या कर्मचाऱ्यांची वर्णी लावली जाणार आहे. सध्या जी भरती सुरू आहे, ती नियमित पदासाठी असून त्याचा हंगामी पद्धतीची नाहीत.

-डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT