Court |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: आयरिश रॉड्रिग्ज यांची शिक्षेविरुद्ध सत्र न्यायालयात आव्हान याचिका

एका महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला काल ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: माजी जलसंपदामंत्री कथित सेक्स स्कँडल प्रकरणी एका महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला काल ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. ही शिक्षा रद्द करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आव्हान अर्जावरील सुनावणी होईपर्यंत या शिक्षेला स्थगिती द्यावी व जामीन द्यावा अशी विनंती केली आहे.

सत्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास अर्जदाराला नामुष्कीला सामोरे जावे लागणार आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेली शिक्षा कोणतेही ठोस पुरावे नसताना दिली आहे.

ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून सोशल मीडियावर बदनामी केल्याचा दावा करण्यात आला आहे ते उपकरण पोलिस तपासावेळी ताब्यातही घेण्यात आले नाही. त्यामुळे आपल्याला बाजू मांडण्यासाठी जामीन द्यावा अशी विनंती रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांना म्हापसा न्यायालयाने दोषी ठरवून विविध गुन्ह्यांप्रकरणी एकूण 2 वर्षे 3 महिन्यांची साधी कैद व 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. या सर्व शिक्षा त्यांना एकाचवेळी भोगायच्या आहेत. न्यायालयाने त्यांना जास्तीत जास्त 1 वर्षाची शिक्षा दिली आहे.

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी अनेकदा तत्कालिन जलसंपदामंत्री यांच्याशी सेक्स स्कँडल संबंधितचे महिला तक्रारदाराची छायाचित्रे फेसबूकवर तसेच इतर काही सोशल मीडियाच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर पोस्ट केली होती. याशिवाय त्याची लिंक तक्रारदाराच्या व्हॉटस्ॲपवर पाठवली होती.

त्यामुळे रॉड्रिग्ज यांनी तक्रारदाराचा विनयभंग तसेच बदनामी केल्याची तक्रार हणजूण पोलिसात या महिलेने दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून ॲड. रॉड्रिग्ज यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र भादंसं कलम 354(ए), कलम 509, कलम 201व 203 खाली सादर केले होते.

तो’ मोबाईल आयरिश यांचाच

तक्रारदाराची बदनामी करण्यासाठी व्हॉटस्ॲप व फेसबुकवर छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी वापरलेला मोबाईल हा त्यांचाच होता हे सेल्युलर कंपनीकडून मिळवलेल्या माहितीद्वारे सिद्ध झाले होते. त्यामुळे न्यायालयाने हा पुरावा ग्राह्य धरत शिक्षा दिली होती. न्यायालयाने ज्या पुराव्यावर आधारित शिक्षा दिली आहे, त्याला रॉड्रिग्ज यांनी आव्हान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉन 16000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ! पुन्हा एकदा 'ले-ऑफ'चा धडाका; बंगळुरु, हैदराबाद अन् चेन्नईतील ऑफिसेस 'हिटलिस्ट'वर

Cricketer Retirement: T20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का; स्टार खेळाडूनं अचानक केली निवृत्तीची घोषणा, पोस्ट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT