IRCTC Goa Tour Package Dainik Gomantak
गोवा

IRCTC Tour Package: गोव्यासह ‘या’ ठिकाणांची करा सैर; IRCTC नं आणलंय शानदार टूर पॅकेज!

IRCTC Tour Package: तुम्ही पर्यटनाचा प्लॅन करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी बेस्ट पॅकेज आणले आहे.

Manish Jadhav

IRCTC Tour Package: तुम्ही पर्यटनाचा प्लॅन करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी बेस्ट पॅकेज आणले आहे. इंडियन रेल्वे टूर कॉर्पोरेशन (IRCTC) वेळोवेळी फ्रेंडली टूर पॅकेजेस लॉन्च करत असते. यामध्येच आता रेल्वेने गोव्यासाठी आणलेल्या खास पॅकेजमध्ये तुम्हाला अहमदाबाद, गोवा आणि उज्जैनला एकत्र भेट देण्याची संधी मिळणार आहे. चला मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

प्रवासाला किती दिवस लागतील?

दरम्यान, हा प्रवास 9 रात्री 10 दिवसांचा असेल. या प्रवासात तुम्हाला केवळ शाकाहारी जेवण मिळेल.

कोणत्या स्थळांना भेट देता येणार?

उज्जैन- महाकालेश्वर, ओंकारेश्वर

अहमदाबाद- साबरमती आश्रम, अक्षरधाम मंदिर, अडालज स्टेप वेल, मोढेरा सूर्य मंदिर

एकता नगर- स्टॅच्यू ऑफ युनिटी

गोवा (Goa)- मंगेशी मंदिर, बॅसिलिक ऑफ बॉम जीझस, सी कॅथेड्रल, कोलवा बीच

कधीपासून प्रवास सुरु होणार?

हा प्रवास 30 जूनपासून सुरु होणार असून 9 जुलै 2024 पर्यंत चालणार आहे.

प्रवास कुठून सुरु होणार?

हे पॅकेज तिरुअनंतपुरम सेंट्रलच्या कोचुवेली स्थानकांपासून सुरु होईल.

Boarding Point

कोचुवेली - कोल्लम - चेंगन्नूर - कोट्टायम - एर्नाकुलम टाउन - त्रिशूर - ओट्टापलम - पलक्कड जंक्शन - पोदानूर जंक्शन - इरोड जंक्शन - सेलम जंक्शन.

De-Boarding Point

मंगळुरू जंक्शन - कन्नूर - कोझिकोड - शोरनूर जंक्शन - त्रिशूर - एर्नाकुलम टाउन, कोट्टायम - चेंगन्नूर - कोल्लम - कोचुवेली.

किती सीट्स असणार?

या पॅकेजमध्ये एकूण 700 लोक प्रवास करु शकतात. ज्यामध्ये एकूण 700 सीट्स आहेत. बजेट पॅकेजसाठी 400 सीट्स, इकॉनॉमी पॅकेजसाठी 150 सीट्स आणि स्टँडर्डसाठी 150 सीट्स असतील.

येथे जाणून घ्या पॅकेज बुक करण्यासाठी किती खर्च येणार?

जर तुम्ही बजेट पॅकेज बुक केले तर तुम्हाला 19,000 रुपये खर्च करावे लागतील. तर एखादे मूल तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला 17,890 रुपये द्यावे लागतील.

तुम्ही इकॉनॉमी पॅकेज बुक केल्यास तुम्हाला 20,970 रुपये खर्च करावे लागतील. तर एखादे मूल तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला 19,660 रुपये द्यावे लागतील.

जर तुम्ही स्टँडर्ड पॅकेज बुक केले तर तुम्हाला 23,600 रुपये खर्च करावे लागतील. तर एखादे मूल तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला 22,020 रुपये द्यावे लागतील.

पॅकेजमध्ये काय मिळणार?

प्रवाशांसाठी प्रवास विमा.

टूर गाइड सेवा

ट्रेनमध्ये सुरक्षा

आवश्यक सहाय्य देण्यासाठी IRCTC टूर मॅनेजर संपूर्ण टूरमध्ये प्रवास करेल.

पॅकेजमध्ये काय मिळणार नाही?

लॉन्ड्री

मॉन्यूमेंट तिकीट शुल्क

मदतीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करु शकता

9281495843

9281495845

तिकीट रद्द केल्यावर किती रिफंड मिळणार?

पॅकेज सुरु होण्याच्या 15 दिवस आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास प्रति व्यक्ती 250 रुपये कट केले जातील.

प्रवास सुरु होण्याच्या 8 ते 14 दिवस आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास, तुम्हाला पॅकेजच्या खर्चातून 25 टक्के रिफंड मिळणार.

प्रवास सुरु होण्याच्या 4 ते 7 दिवस आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास तुम्हाला पॅकेजच्या खर्चाच्या केवळ 50 टक्के रक्कम मिळेल. तथापि, जर तुम्ही 4 दिवस अगोदर तिकीट बुक केले तर तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाही.

प्रवासादरम्यान ही कागदपत्रे सोबत ठेवा

प्रवासादरम्यान क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी ओळखीचा पुरावा म्हणून ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड) सोबत ठेवा. तिकीट आणि ओळखपत्राशिवाय प्रवासात सामील होणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

Pilgao Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा! डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी; आंदोलनाची दिशा ठरणार?

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

SCROLL FOR NEXT