Panjim smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: IPSCDL च्या अधिकाऱ्यांनीच व्यक्त केली कामांबाबत नाराजी; म्हणाले, स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची!

Panjim Smart City: उदय मडकईकर: कंत्राटदार, सल्लागारावर गुन्हा नोंदविण्याची मागणी

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: पणजीला स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेली कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. खुद्द इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी गुरुवारी केलेल्या पाहणीत कामावर नाराजी व्यक्त करीत कंत्राटदारांवर आगपाखड केली होती.

त्यावरून आतातरी कंत्राटदारांवर आणि सल्लागारावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी उदय मडकईकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना केली.

मडकईकर म्हणाले, स्मार्ट सिटीची कामे ही दीर्घकाळ टिकणारी असावीत, असा निकष आहे. काही महिन्यांपूर्वी आयपीएससीडीएलचे सीईओ संजीत यांनीच शहरातील कामे भविष्यातील ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून केली जात आहेत, असे सांगितले होते.

जर तसे असेल तर सध्याच्या रस्त्याच्या डांबरीकरणावर खडीचा आणि हॉटमिक्सचा थर हथरून रस्ता तयार केला जात असेल, तर तो टिकणार किती काळ, असा प्रश्‍न आहे.

वर्षभरानंतर संबंधित खात्याला रस्त्याच्या कामांची निविदा काढायची का? असाही प्रश्‍न समोर उपस्थित होतोच.

पणजीतील नागरिक सुज्ञ आहेत, ज्यांना या कामातील चुका दिसतात, त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ चित्रण करून सरळ समाज माध्यमांतून व्हायरल करतात. गटाराचे किंवा रस्त्याचे काम असो कंत्राटदार तडजोडीचे काम करीत असल्याचे दिसत आहे.

सांतिनेज व कांपाल भागातील रस्त्यावर एक फूट खोल खोदून भराव टाकून काँक्रीट टाकले जात असेल, तर इतर भागातील रस्त्यावर डांबरीकरण का? याचे स्पष्टीकरण आयपीएससीडीएलने द्यायला हवे.

महापालिकेने कामावर लक्ष ठेवावे:-

आपण महानगरपालिकेच्या बैठकीत संबंधित कंत्राटदारांना बोलावून कामाविषयी विचारणा करावी, अशी मागणी केली होती. परंतु महानगरपालिका त्याबाबत फारशी उत्सुक नसल्याचे दिसून आले.

महानगरपालिकेचीही कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे, पण ते काम कोण करणार असाही प्रश्‍न असल्याचे मडकईकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT