President suspends IPS officer who misbehaved with woman at Goa beach club 
गोवा

गोव्यात पबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणारा IPS अधिकारी निलंबित, राष्ट्रपतींनी केली कारवाई

अधिकाऱ्यावर कडक कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिले होते.

Pramod Yadav

President suspends IPS officer who misbehaved with woman at Goa beach club

गोव्यातील एका पबमध्ये एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरचे 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. ए. कोन यांना "तत्काळ प्रभावाने" निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी (दि.11) केंद्रीय गृहमंत्रालयाने ही निलंबनाची कारवाई केली.

गृह मंत्रालय हे आयपीएस अधिकार्‍यांसाठी संवर्ग नियंत्रण प्राधिकरण आहे. गोवा सरकारकडून प्राथमिक चौकशी अहवाल मंत्रालयाला प्राप्त झाल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिकारी कोन राज्य पोलीस मुख्यालयाशी संलग्न राहतील आणि निलंबन आदेश लागू होईपर्यंत त्यांना सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. असे आदेशात म्हटले आहे.

उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या अधिकाऱ्याला यापूर्वी गोवा सरकारने त्यांच्या पदावरून मुक्त केले होते आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

या अधिकाऱ्यावर कडक कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिले होते. गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) आमदार विजय सरदेसाई यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Trafficing: केरी चेकपोस्टवर 2000 किलो गोमांस जप्त! 2 दिवसांतील तिसरी घटना; पुन्हा तेच वाहन पकडले Video

Goa Politics: खरी कुजबुज; सिनेप्रेम ठीक आहे हो, परंतु पार्किंगचे काय?

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT