Vincent Ramos Died: गोव्याच्या हॉस्पिटॅलिटी उद्योगातील तारा निखळला, व्हिन्सेंट रामोस यांचे निधन

मूळ चोडण येथील व्हिन्सेंट यांनी हॉटेल उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
IHCL VP Goa's Vincent Ramos Passed Away
IHCL VP Goa's Vincent Ramos Passed Away
Published on
Updated on

IHCL VP Goa's Vincent Ramos Passed Away: गोव्याच्या हॉस्पिटॅलिटी उद्योगातील अग्रगण्य व्यक्तिमत्व व्हिन्सेंट रामोस यांचे निधन झाले आहे. बुधवारी (दि.16) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान, त्यांना ह्रदयविकाचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचाराला रामोस यांनी प्रतिसाद दिला नाही. व्हिन्सेंट रामोस 55 वर्षांचे होते.

मूळ चोडण येथील व्हिन्सेंट यांनी हॉटेल उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

व्हिन्सेंट रामोस इंडियन हॉटेल्स कंपनी लि.चे (IHCL) वरिष्ठ उपाध्यक्ष होते. तसेच, ताज हॉटेल्स ग्रुपचे ते महत्वाचे घटक होते. पर्यटन आणि हॉटेल संघटनांसाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रामोस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "IHCL चे वरिष्ठ उपाध्यक्ष व्हिन्सेंट रामोस यांच्या अकाली निधनाने मला दु:ख झाले. आतिथ्य उद्योगातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व. तरुणांना हॉस्पिटॅलिटी उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी व्हिन्सेंट नेहमीच उत्सुक होते. आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रातील विविध कार्यक्रम तयार करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला सहकार्य केले. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला माझ्या संवेदना. देव त्यांना यातून सावरण्याची शक्ती देवो."

IHCL VP Goa's Vincent Ramos Passed Away
Bicholim: अकरावीच्या वर्गात मुलांनी मारला स्प्रे, 11 विद्यार्थिनींना श्वासोच्छवासाचा त्रास; पोलिसांसमोर पेच

गिरी येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, रामोस यांनी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, गोवा येथे हॉटेल व्यवस्थापनाचे व्यावसायिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई येथून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

एवढेच नव्हे तर, आयआयएम-अहमदाबाद, कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि नानयांग युनिव्हर्सिटी सिंगापूर कडून त्यांना प्रतिष्ठित प्रमाणपत्रे मिळाली. दीड दशकांच्या कारकिर्दीत रामोस यांनी देशभरात आपली छाप सोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com