IPS Indradev Shukla is new Director General of Police of Goa  Dainik Gomantak
गोवा

IPS इंद्रदेव शुक्ला गोव्याचे नवे पोलिस महासंचालक

1995 मध्ये शुक्ला राज्यात पोलिस उपअधीक्षकपदी नेमणूक झाली होती. तेव्हा ते पणजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांची दिल्लीमध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी 1995 ॲग्मूट केडरचे आयपीएस अधिकारी इंद्रदेव शुक्ला (IPS Indradev Shukla) यांची वर्णी लावली आहे. हा बदलीचा आदेश आज गृह मंत्रालयाने काढला. नवे पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला हे गोव्यात अनेक वर्षे होते. 1995 मध्ये त्यांची राज्यात पोलिस उपअधीक्षकपदी नेमणूक झाली होती. तेव्हा ते पणजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी होते. त्यानंतर त्यांना अधीक्षकपदी बढती मिळाली व त्यानंतर ते आयपीएस ॲग्मूट केडरमध्ये अधिकारी बनले.

...म्हणून मीणा डोईजड

महासंचालकपदी मीणा यांनी अधीक्षकांचे अधिकार काढून घेऊन सर्व फाईल्स आपल्या कार्यालयातून संमत केल्या. त्यामुळे अनेकदा त्यांच्याशी अधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांचे खटकेही उडाले होते. काही सत्ताधारी राजकारण्यांकडून त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे मीणा सरकारलाही डोईजड झाले होते.

पंकज कुमार यांचीही बदली

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार (आयपीएस) यांची दिल्ली येथे युवा व्यवहार खात्याच्या उपसचिवपदी बदली करण्यात आली आहे. ते 2008 ॲग्मूट केडरचे आयपीएस अधिकारी असून त्यांची 2019 मध्ये गोव्यात बदली झाली होती. त्यांच्या पत्नी अस्लम खान या सध्या गोव्यात पोलिस उपमहानिरीक्षक पदावर आहेत. गृह मंत्रालयाने त्यांची शिफारस केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

जंतरमंतरवर सरकारविरोधात तरुणाई, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT