क्राईम ब्रँचची कारवाई, राजस्थानच्या चौघांना अटक  Dainik Gomantak
गोवा

कळंगुट येथे IPL क्रिकेटसाठी सट्टेबाजी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

क्राईम ब्रँचची कारवाई, राजस्थानच्या चौघांना अटक

दैनिक गोमन्तक

पणजी: कळंगुट (calangute) येथील डिसोझा गेस्ट हाऊसवर (D'souza Guest House) गोवा पोलिसांच्या (Police) क्राईम ब्रँचने (Crime Branch) काल (28 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास छापा टाकून सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी (Cricket Cetting) राजस्थानच्या चौघांना अटक केली. त्यांनी काल सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांसाठी सुमारे चार लाखांची रक्कम सट्टेबाजीसाठी घेतली होती. या छाप्यावेळी रोख रक्कमेसह दोन लाखांचा मुद्देपाल जप्त करण्यात आला आहे.

या सट्टेबाजीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे प्रताप सिंग, राजीव सिंग, मोहनलाल व अजय यादव अशी असून हे सर्व राहणारे राजस्थानमधील आहेत. कळंगुट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने या गेस्ट हाऊसमध्ये अचानक रात्री छापा टाकला व तेथील सर्व खोल्यांची झडती घेतली असता एका खोलीमध्ये हे चौघेजण सापडले. लॅपटॉप तसेच मोबाईलवरून हे सट्टेबाजी करत असल्याचे त्यांची चौकशी केली असता तसेच तेथे असलेल्या सामानावरून आढळून आले.

काही दिवसांपूर्वी ते गोव्यात आले होते व आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी सट्टेबाजीची रक्कम घेत असल्याचे उघड केले आहे. दरम्यान, दरवर्षी आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाल्यावर पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी सट्टेबाज गोवा हे सुरक्षित ठिकाण आहे. असे समजून गोव्यात येतात. गेस्ट हाऊसमध्ये किंवा अलिशान हॉटेलमध्ये पर्यटक म्हणून खोल्यांचे आरक्षण करतात व त्यानंतर ते सट्टेबाजीचा व्यवहार सुरू करतात. यापूर्वी गोव्यातून राज्यातील बाहेरील सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. या सट्टेबाजीवर मोठ्या रक्कमाही गुंतवण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. पोलिसांनी वेळोवेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे टाकून कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT