IPL Cricket Betting Dainik Gomantak
गोवा

IPL Cricket Betting: पणजीत IPL बेटिंगचा पर्दाफाश; गुजरातमधील चौघांना अटक, 4.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Panjim IPL Betting Racket: आयपीएल सामन्यांदरम्यान ऑनलाइन सट्टेबाजीचे नेटवर्क उघडकीस आणत पणजी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: आयपीएल सामन्यांदरम्यान ऑनलाइन सट्टेबाजीचे नेटवर्क उघडकीस आणत पणजी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राज्यात वाढत्या सट्टेबाजांवर वचक बसवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, पणजीतील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत गुजरातमधील चार सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे.

४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा पोलिसांकडून ११ एप्रिलच्या रात्री १०.२० वाजता सुरू होऊन १२ एप्रिलच्या पहाटे १.३० वाजेपर्यंत चालली. या छाप्यात पोलिसांनी आरोपींकडून ६ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, आणि सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे इतर उपकरणांसह सुमारे ४.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चारही आरोपी गुजरातचे

पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे सर्वजण गुजरात राज्यातील असल्याची माहिती समोर आलीय. मनीषकुमार अशोककुमार कृश्नानी (वय-३९, रा.अहमदाबाद), गोपाळबाई जामनदास कोकरा (वय- ४५, रा. गांधीनगर), संदीप इंदरबाई पंजवानी (वय- ३०, रा. अहमदाबाद), जितेंद्र चंदूलाल करमानी (वय- ३६ रा. गांधीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक सुदेश नाईक आणि पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. पोलीस उपनिरीक्षक साहिन शेट्ये आणि त्यांच्या पथकानं ही यशस्वी धडक मोहीम राबवली.

सट्टेबाजीच्या प्रमाणात वाढ

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सट्टेबाजीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी गोवा पोलीस सट्टेबाज टोळ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करत आहेत.

राज्यात आयपीएल सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT