RCB Fan Viral Letter Dainik Gomantak
गोवा

IPL 2025: वेड RCB चं! चाहत्यानं थेट मुख्यमंत्र्यांकडे केली 'सार्वजनिक सुट्टी'ची मागणी!

RCB fan request public holiday: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने विजय मिळवल्यास, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ३ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी

Akshata Chhatre

RCB fans ask for public hoilday on 3 june: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने विजय मिळवल्यास, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ३ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी एका चाहत्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रातून केली आहे. या चाहत्याने आरसीबीचा विजय 'कर्नाटक राज्य आरसीबी फॅन्स उत्सव' म्हणून साजरा करण्याची विनंती केली आहे, हा उत्सव कर्नाटक राज्योत्सवाप्रमाणेच भव्य असावा, अशी त्याची अपेक्षा आहे.

चाहत्याचे मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन

या पत्रात चाहत्याने लिहिले आहे की, "मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की, जर आरसीबी संघाने अंतिम फेरीत पोहोचून आयपीएल सामना जिंकला, तर तो दिवस कर्नाटक राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी आणि हा दिवस 'कर्नाटक राज्य आरसीबी फॅन्स उत्सव' म्हणून साजरा करावा."

या पत्रात पुढे म्हटले आहे की, "कर्नाटक क्रिकेटप्रेमासाठी आणि विशेषतः आरसीबीसाठी ओळखले जाते. आम्ही, आरसीबीचे चाहते, आरसीबीच्या प्रत्येक विजयाचा मोठ्या उत्साहात जल्लोष करतो. म्हणूनच, जर आरसीबीने कप जिंकला तर कर्नाटक राज्य सरकारने सुट्टी जाहीर करावी आणि 'कर्नाटक राज्य आरसीबी फॅन्स उत्सव' साजरा करावा, अशी मी नम्र विनंती करतो."

२००८ पासून आरसीबीच्या चांगल्या-वाईट काळात सोबत असलेल्या निष्ठावान चाहत्यांसाठी हा दिवस दरवर्षी साजरा करावा, अशीही विनंती या चाहत्याने केली आहे.

आरसीबी अंतिम फेरीत, विजेतेपदाची प्रतीक्षा

आरसीबीने गुरुवारी (२९ मे) क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा आठ गडी राखून पराभव करत आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. २०१६ नंतर प्रथमच आरसीबीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामन्यात त्यांचा सामना मुंबई इंडियन्स किंवा पंजाब किंग्ज यांच्यापैकी एका संघाशी होणार आहे.

जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या क्रिकेट फ्रँचायझींपैकी एक असूनही, आरसीबीने गेल्या १७ वर्षांत तीन वेळा (२००९, २०११ आणि २०१६) अंतिम फेरीत पोहोचूनही एकदाही आयपीएल विजेतेपद जिंकले नाही,मात्र आरसीबी यावेळी नक्कीच चाहत्यांचा हिरमोड करणार नाही असं म्हटलं जातंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT