Goa Student: Dainik Gomantak
गोवा

Goa Student: मडगावी ‘एआय’चा आविष्‍कार; आता विद्यार्थ्यांना शिकविणार रोबोट

Goa Student: समाजसेवा संघाच्‍या एआय-राेबोटिक्‍स केंद्राचे आज उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Goa Student: कृत्रिम बुद्धिमत्ता म्‍हणजेच आजच्‍या काळात जो परवलीचा शब्द बनला आहे, त्‍या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’च्या (एआय) क्षेत्रात जे चमत्‍कारिक आविष्‍कार निर्माण झाले आहेत, त्‍यातील काही आविष्‍कार ‘याची देही, याची डोळा’ पाहण्‍याची संधी मडगावसह राज्यातील लोकांना पुढील दाेन दिवस मिळणार आहे.

पुढील दाेन दिवसांत येथील रवीन्‍द्र भवनात आयोजिलेल्‍या दाेन दिवसांच्‍या रोबोटिक प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांना चक्‍क रोबोट शिकविताना दिसणार आहेत. शिवाय समाजसेवा संघाच्‍या एआय आणि राेबोटिक्‍स केंद्राच्‍या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्‍या आविष्‍कारांचीही पाहणी करता येणार आहे. विशिष्‍ट सेवा देणारे ड्रोन्‍सही येेथे

पाहायला मिळणार आहेत.

गोव्‍यातील काही जुन्‍या अग्रगण्‍य शिक्षण संस्थांत समावेश असलेल्‍या मडगावच्‍या समाजसेवा संघ या संघटनेचा ९० वा वर्धापनदिन कार्यक्रम २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस आयोजित केला असून या संघटनेने सुरू केलेले एआय आणि राेबोटिक्‍स केंद्राचे यानिमित्ताने उद्‍घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाची खासियत म्‍हणजे, यात ‘ह्युमोनॉईड रोबोटस्‌’ पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात तीन कंपन्‍यांचे रोबाेटस्‌ आणि इतर उत्‍पादनांच्‍या प्रदर्शनासह समाजसेवा संघाच्‍या एआय आणि रोबोटिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्‍या प्रकल्‍पाची १४ दालने असणार आहेत. हे दोन दिवसांचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती समाजसेवा संघाचे अध्‍यक्ष सुनील नायक यांनी दिली.

21 रोजी सकाळी 10 वाजता या प्रदर्शनाचे उद्‍घाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍या हस्‍ते होईल, तर समारोप समारंभ २२ रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या उपस्‍थितीत होणार आहे. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे उपस्‍थित राहाणार आहेत.

नायक म्‍हणाले की, शाळांपासून उद्योगांपर्यंत ‘एआय’ शिक्षणाचा उपयोग ही मुख्‍य संकल्‍पना हा कार्यक्रम आखताना केली आहे. यात विद्यार्थ्यांसह काही औद्योगिक आस्‍थापनांनाही सामावून घेतले आहे. यात एक कंपनी बंगळुरूची असून या कंपनीने शिक्षणाला मदत करणारे मानवी आकाराचे ह्युमोनाॅईड रोबोटस्‌ तयार केले आहेत. त्‍यांचे प्रदर्शन येथे होणार आहे. हे रोबोटस्‌ विद्यार्थ्यांना कसे शिकवितात, याची प्रात्‍यक्षिके दाखवली जाणार आहेत.

मुंबईच्‍या एका कंपनीतर्फे विविध तऱ्हेचे काम करणाऱ्या ड्रोन्‍सची प्रात्‍यक्षिके सादर करण्यात येतील. हल्‍लीच यशस्‍वीरित्‍या पार पडलेल्‍या चांद्रयान मोहिमेची काही उपकरणे तयार करणारी गोव्‍यातील ‘कायनेको’ कंपनीच्‍या या मोहिमेतील उपकरणे येथे प्रदर्शनात ठेवण्‍यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाविष्कार : समाजसेवा संघाचे एआय आणि रोबोटिक्‍स केंद्राचे वर्ग गेले वर्षभर सुरू असून त्‍यात तिसरीपासून दहावीपर्यंतचे विद्यार्थी कोडींग आणि रोबोटिक्‍सचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सूर्ययान, प्रश्‍नांना उत्तरे देणारा ह्यूमोनाॅईड रोबोट, चालत्‍या गाडीची गती मोजणारा स्‍पीड डिटेक्‍टर, ज्‍येष्‍ठांना गुडघ्‍यांचे व्‍यायाम करण्‍यासाठी आधार देणारे ‘नी जॉईन्‍टस’ उपकरण, स्‍वत: काम करणारा व्‍हॅक्‍यूम क्‍लिनर अशा अनेक आविष्‍कारांची पाहणी करता येणार आहे.

तज्ज्ञांना ऐकण्याची संधी

‘इस्रो’च्‍या माजी प्रकल्‍प संचालक टी. के. अनुराधा यांचे ‘इस्रोतील महिला सबलीकरण आणि आजचा भारत’ या विषयावर तर महिला नूतनचे माजी विद्यार्थी आणि अमेरिकेतील ‘बेल लॅब्‍स’ या अग्रगण्‍य आस्‍थापनाचे माजी प्रमुख डॉ. संजय कामत यांचे ‘एआय आणि रोबोटिक्‍स क्षेत्रातील नव्‍या युगाची तयारी करताना’ या विषयावर व्‍याख्‍यान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT