Drugs Arrest Canva
गोवा

Goa Drugs Case: 11.67 कोटींच्या ड्रग्जप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, व्यवहाराची पाळेमुळे देशाबाहेर; इतर संशयित थायलंडमध्ये लपल्याचा अंदाज

Guirim Drugs Case: गिरी येथे पकडलेल्या ११ कोटी ६७ लाख रुपयांच्या अमलीपदार्थ व्यवहाराची व्याप्ती देशाबाहेरही असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गिरी येथे पकडलेल्या ११ कोटी ६७ लाख रुपयांच्या अमलीपदार्थ व्यवहाराची व्याप्ती देशाबाहेरही असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आजवर तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

गिरी येथे राहणारा गौतम एम (२६, बंगळूर) याच्या सदनिकेची तपासणी केली असता पोलिसांना पारदर्शक प्लास्टिक पिशवीत सुकवलेले हिरवट फळधारक शेंडे (बड्स) आढळले, जे हायड्रोपोनिक वीड (गांजा) असल्याचा संशय आहे.

पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी छापा टाकला आणि त्यांनी गौतम याला मुद्देमालासह अटक केली. त्यानुसार ८ मार्च २०२५ रोजी सकाळी पोलिस निरीक्षक प्रशाल पी. एन. देसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.

चौकशीत असेही उघड झाले की, हा अमलीपदार्थ गोव्यात विकला जाणार होता. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणण्यात गोवा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. टोळीतील इतर सदस्य सध्या थायलंडमध्ये लपल्याचा संशय असून त्यांच्याविरुद्ध लूक-आउट सर्क्युलर आणि ब्लू नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व संशयित सध्या पोलिस कोठडीत अाहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT