Crime News Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चक्क सुलभ शौचालयाजवळ सापडला आरोपी; मडगावात 1 लाख रुपयांचा गांजा जप्त

Madgaon Crime News: गोवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लाख ९ हजार रुपये किमतीचा १,०९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय

Akshata Chhatre

मडगाव: राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसवत गोवा पोलिसांनी आणखीन एक मोठी कामगिरी बजावली. दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात जुन्या रेल्वे स्टेशनजवळील परिसरात पोलिसांना गांजा पकडण्यात यश मिळाले आहे. गोवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लाख ९ हजार रुपये किमतीचा १,०९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. तसेच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुलभ शौचालयाजवळ पकडला आरोपी

गोवा केलेल्या कारवाईत मडगावमधील जुन्या रेल्वे स्थानकाच्या रस्त्याजवळ असलेल्या सुलभ शौचालयाच्या परिसरात छापा टाकून १ लाख ९ हजार रुपये किमतीचा १,०९० ग्रॅम गांजा जप्त केला गेलाय. या प्रकरणी रोहित पांढरेकर याला ताब्यात घेण्यात आले असून, नंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, मडगाव पोलिसांनी जुन्या रेल्वे स्टेशन रोड परिसरात सापळा रचला होता. संशयित रोहित पांढरेकर सुलभ शौचालयाजवळ फिरत असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ १,०९० ग्रॅम गांजा सापडला. या गांजाची बाजारातील किंमत १ लाख ९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शुभम गावकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रोहित पांढरेकर हा यापूर्वीही अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुंतलेला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, या गांजाच्या तस्करीमध्ये आणखी कोण सामील आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या गोवा पोलीस अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अधिक सतर्क झाले असून यापूर्वीही मडगाव पोलिसांनी अनेकदा अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई केली आहे.

मांद्रे येथे पोलिसांची कारवाई

मडगाव पोलिसांप्रमाणेच उत्तर गोव्यात मांद्रे पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत ११.६ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी २९ वर्षीय रॉय नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला मूळची पश्चिम बंगालची असून, ती कांदोळी, बार्देस येथे येथे राहत होती. मांद्रे पोलीस महिला उपनिरीक्षक अर्चना शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे यश शूटिंग हबजवळ सापळा रचला होता. त्यावेळी रॉय संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. तिची तपासणी केली असता तिच्याजवळ सुमारे ११.६ किलो गांजा सापडला. या गांजाची किंमत सुमारे ११ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत दोन पंच साक्षीदार म्हणून उपस्थित होते. आरोपी महिलेवर एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांद्रे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक गरूडी यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रॉय या गांजाच्या तस्करीमध्ये सक्रियपणे सहभागी होती. ती गोव्यात गांजा विक्रीसाठी आणत होती. या गांजाचा पुरवठा कोठून होत होता आणि या तस्करीमध्ये आणखी कोण सामील आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT