Mandrem Schools: मांद्रेतील 12 शाळांमध्ये बसवण्यात येणार 'स्मार्ट बोर्ड'; आमदार जीत आरोलकरांची घोषणा

Mandrem Constituency Education Development: मांद्रे मतदारसंघातील एकूण १२ सरकारी शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड बसवून विद्यार्थ्यांची सोय करु, अशी ग्वाही मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
MLA Jit Arolkar
MLA Jit ArolkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Education Reforms Smart Boards Schools In Mandrem

मोरजी: गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रत्येक गावागावात वाड्या वाड्यांवर शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा सुरू केल्या. त्या शाळांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल. मांद्रे मतदारसंघातील एकूण १२ सरकारी शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड बसवून विद्यार्थ्यांची सोय करु, अशी ग्वाही मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त मांद्रे मधलामाज भाऊसाहेब बांदोडकर उद्यानातील अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘मगो’ चे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, अमृत आगरवाडेकर, सूर्या शेटगावकर गजानन शेटगावकर, मांद्रेचे सरपंच राजेश मांजरेकर, हरमल पंच सदस्य अनुपमा मयेकर , पार्से पंच अजित मोरजकर, स्वप्निल नाईक,माजी पंच प्रवीण वायंगणकर, दयानंद मांजरेकर आदी नागरिक उपस्थित होते.

MLA Jit Arolkar
Mandrem Carnival: आमदार आरोलकरांच्या प्रयत्नांना यश! मांद्रे येथे 'व्हिवा कार्निव्हल'चा धमाका; विदेशी पर्यटकांची तुफान गर्दी

आमदार जीत आरोलकर म्हणाले भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुळ मुंडकरांचा कायदा अमलात आणला. त्या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आपण चर्चाही करून कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू. कुळ मुडकारांना मुख्यमंत्री न्याय मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com