Interstate cyber crime gang arrested in UP Dainik Gomantak
गोवा

आंतरराज्य सायबर गुन्हे टोळीचा युपीत पर्दाफाश

राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्या नावाने बनावट ईमेल अकाऊंट उघडून फेसबुकवरून पैशांची मागणी करून लोकांची फसवणूक

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याचे मुख्य सचिव परिमल राय (Chief Secretary of the State Parimal Rai) यांच्या नावाने बनावट ईमेल अकाऊंट (email) उघडून फेसबुकवरून (Facebook) पैशांची मागणी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोव्याच्या सायबर क्राईम (Goa Cyber Crime) पथकाने उत्तर प्रदेशात (UP) कारवाई करत पर्दाफाश केला. या प्रकरणातील मुख्य म्होरके (मास्टरमाईंड) संशयित शिवकुमार गॅगवार व गुलाम गोम्स या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 25 पेक्षा अधिक मोबाईल सिमकार्ड तसेच दहाहून अधिक मोबाईल व टॅबलेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्याची माहिती सायबर क्राईम कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईवेळी संशयितांच्या खोलीतून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झालेले सुमारे 50 हून अधिक बँक खात्याची माहिती गोळ्या करण्‍यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही संशयितांना बरेली (उत्तर प्रदेशात) येथील न्यायालयात रविवारी उभे करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला आहे. गोवा पोलिस पथक त्यांना घेऊन लवकरच गोव्यात येणार आहेत.

अत्‍याधुनिक यंत्रणेद्वारे शोध

गोव्यातील अनेक सनदी तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ईमेलद्वारे फेसबुकवरून पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी गोव्याच्या सायबर क्राईम कक्षाकडे आल्या होत्या. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांचे ईमेल अकाऊंट हॅक 20 सप्टेंबरला करून त्याच्या बदल्‍यात त्यांच्याच नावाने बनावट ईमेल अकाऊंट तयार करून पैशांची मागणी केली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले असता, सायबर क्राईम कक्षाकडे तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तींविरुद्ध भा. दं. सं.च्‍या कलम 419, 420 व माहिती तंत्रज्ञान कलम 66, 66 सी व 66 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनंतर या कक्षाचे अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांची चौकशी सुरू झाली. कक्षाकडे असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आल्यावर त्यामध्ये यश आले व त्यांना गजाआड करण्याची व्यूहरचना करण्यात आली.

प्रकरणे अनेक, तक्रारी मोजक्याच

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू झाल्यानंतर परिमल राय यांचा ईमेल अकाऊंट उत्तर भारतातून हॅक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या एका पथकाला दिल्ली व उत्तर प्रदेशातील काही भागांत याप्रकरणाची चौकशी करण्यास पाठवले होते. या चौकशीसाठी गोवा पोलिसांनी दिल्ली व उत्तर प्रदेशातील पोलिसांची मदत घेऊन सायबर क्राईममधील मास्टरमाईंड शिवकुमार व गुलाम यांना अटक केली होती. ईमेल हॅक करून बनावट अकाऊंट उघडून लोकांकडून पैसे मागण्याचे प्रकार करत असल्याची कबुली संशयितांनी प्राथमिक चौकशीत दिली आहे. राज्यात अशा प्रकारची अनेक प्रकरणे घडली असली तरी काहीजणांनीच तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT