Women Day 2024 Celebrated in Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘वेदांता’तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान : डिचोलीत आयोजन

Bicholim News : आंतरराष्ट्रीय महिलादिन सोहळा उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, ''वेदांता'' (सेसा) कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांना ''आयर्न लेडी'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यास वेदांताचे (सेसा) मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जाजू, सीएफओ सौरव सेकसरिया, मुख्य कॉर्पोरेट संचार अधिकारी संध्या मलिक आणि अन्य अधिकारी उपस्थित

होते.

या सोहळ्यात मनाली तूरकर, समंथा परेरा, रिंकी पटेल, श्वेता जेएस, निलिमा गडेकर, अनन्या जी. प्रियांका बाबोरिया, प्रियांका नाईक, सौम्यता सिंग आणि प्रज्ञा सावंत या महिला कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

सन्मानमूर्ती डॉ. दीपा मलिक, साक्षी काळे आणि सिसील रॉड्रीग्ज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन्मान केल्याबद्धल त्यांनी ‘वेदांता’ला धन्यवाद दिले.

अधिकारी संध्या मलिक यांनी डॉ. दीपा मलिक, साक्षी काळे आणि सिसील रॉड्रीग्ज या महिलांनी आपापल्या क्षेत्रात केलेली कामगिरी ही समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त करुन सन्मानमूर्तीचे अभिनंदन केले.

नवीन जाजू आणि सौरव सेकसरिया यांनी सन्मान करण्यात आलेल्या महिलांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘आयर्न लेडी’ पुरस्काराने सन्मान

अर्जुन पुरस्कार आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेती डॉ. दीपा मलिक, राष्ट्रीय ॲथेलिट विजेती साक्षी काळे आणि सिसील रॉड्रीग्ज या महिलांना ‘आयर्न लेडी’ हा सन्मान प्राप्त झाला. नवीन जाजू आणि सौरव सेकसरिया यांच्या हस्ते या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT