Political Reservation For ST Community In Goa
Political Reservation For ST Community In GoaDainik Gomantak

Goa ST Reservation: गोव्यातील एसटींसाठी खुशखबर! राजकीय आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Political Reservation For ST Community In Goa: गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना आरक्षण देण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
Published on

Political Reservation For ST Community In Goa

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना आरक्षण देण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (दि.07 मार्च) मंजुरी दिली.

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. अनुसूचित जमातींसाठी (एसटी) गोवा विधानसभेत जागा राखीव नाही, असे गोयल म्हणाले.

एसटी समुदायाच्या मागणीनुसार, मंत्रिमंडळाने 'अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्व पुनर्संरचना विधेयक, 2024 ला मंजूरी दिलीय, यामुळे जनगणना आयुक्तांना गोव्यातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या सूचित करण्याचे अधिकार मिळणार आहे.

Political Reservation For ST Community In Goa
INDI Alliance LS Goa Candidate: गोव्यातील 'इंडिया' आघाडीचे लोकसभा उमेदवार कधी ठरणार? युरी आलेमाव यांनी दिली माहिती

40 सदस्यसीय गोवा विधानसभेत एसटी आरक्षणासाठी निवडणूक आयोग संसदीय आणि विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमन आदेश, 2008 मध्ये सुधारणा करेल.

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना आरक्षण देणारे विधेयक सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेत सादर केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com