International Golden Globe Race :पणजी, आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब रेस (जीजीआर) यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या कमांडर अभिलाष टॉमी यांनी आता नौदलाच्या सेलिंग पदकाचे प्रशिक्षण पद स्वीकारले आहे.
अभिलाष यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्या हस्ते गोव्यात विशेष सन्मान करण्यात आला.
कमांडर टॉमी यांनी सेलिंग मधील आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब स्पर्धेमध्ये दुसरे स्थान मिळवून इतिहास रचला आहे.
ही शर्यत पूर्ण करणारे ते पहिले आशियाई आहेत. ४ सप्टेंबर २०२२ रोजी टेक ऑफ झाल्यापासून २३६ दिवस १४ तास आणि ४६ मिनिटात पूर्ण पृथ्वीला फेरी मारून ही शर्यत पूर्ण केली.
याआधी, २०१३ मध्ये त्यांनी आयएनएसव्ही म्हादई जहाजातून एकट्याने, नॉन-स्टॉप जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले होते.
जीजीआर - १८ मध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता, परंतु वादळात झालेल्या अपघातात पाठीच्या दुखापतीमुळे त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. पाच वर्षांनंतर पाच शस्त्रक्रियेनंतर त्यांनी ही स्पर्धा जिंकली.
टॉमी यांनी आता सागर परिक्रमेची भारतीय नौदलाची पुढील आवृत्ती म्हणून एकल प्रदक्षिणा प्रवासाची तयारी करणाऱ्या दोन नौदल महिला अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.