Mopa International Airport
Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपावरून 26 मार्चनंतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या सेवेस सुरुवात

दैनिक गोमन्तक

Mopa International Airport: उत्तर गोव्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोपा विमानतळावरून आता 26 मार्चनंतर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य नागरी विमान खाते आणि जीएमआर संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

या विमानतळाचे 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर 5 जानेवारीपासून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात झाली असून सध्या 3 विमान कंपन्या आपली सेवा देत आहेत.

यात इंडिगो, गो-एअर आणि अक्क्षा या विमान कंपन्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 1 लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

आतापर्यंत या विमानतळावरून 1 हजार 100 विमानांचे लँडिंग आणि उड्डाण झाले आहे. सध्या देशातीलच 9 शहरांना या विमानतळावरून सेवा (कनेक्टिव्हिटी) सुरू आहे. मार्चनंतर ही सेवा डबल होणार असून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहे.- डॉ. सुरेश शानभोग, राज्य नागरी विमान वाहतूक संचालक

आंतरराष्ट्रीय ठिकाणांची निवड

जीएमआर कंपनीच्या सूत्रांनुसार कंपनीने जगभरातल्या अनेक विमान कंपन्यांशी यासंबंधीचे करार केलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणे (डेस्टिनेशन) यांचीही निवड केली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात युरोप, रशिया, मध्य आशियाई देशांबरोबर दक्षिण पॅसिफिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे.

कस्टम, इमिग्रेशनसाठी विलंब

कोणत्याही विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या कस्टम आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या इमिग्रेशन विभागाची परवानगी लागते. याशिवाय या दोन्हीही विभागांचे स्वतंत्र कक्ष उभारणे अपेक्षित असते.

या विमानतळावरील ब्लॉक सी आणि ब्लॉक डी हे दोन विभाग या सेवेसाठी राखीव ठेवले आहेत. या सुविधांकरताच आंतरराष्ट्रीय विमान सेवेला विलंब होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT