International Film Festival of India, IFFI Goa Opening Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: इफ्‍फीचे उद्‍घाटन होणार शानदार! चित्ररथ मिरवणुक रंगणार; गोव्यातील चित्रपट संस्‍कृतीचे होणार दर्शन

IFFI Goa Opening: २० नोव्‍हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचे (इफ्‍फी) उद्‍घाटन प्रथमच गोमेकॉच्‍या जुन्‍या इमारतीसमोर होणार.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: येत्‍या २० नोव्‍हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचे (इफ्‍फी) उद्‍घाटन प्रथमच गोमेकॉच्‍या जुन्‍या इमारतीसमोर होणार असून, त्‍यात चित्ररथांचेही सादरीकरण करण्‍यात येणार आहे. समारोप सोहळा मात्र बांबोळी येथील डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्‍टेडियमवर होईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पर्वरीतील मंत्रालयात सोमवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यंदाच्‍या इफ्‍फीचे उद्‍घाटन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करावे, अशी मागणी आयोजकांनी सरकारकडे केलेली होती. त्‍यानुसार आम्‍ही त्‍यांना कार्निव्‍हल आणि शिमगोत्‍सवातील चित्ररथांच्‍या सादरीकरणाद्वारे उद्‍घाटनाचा पर्याय दिलेला होता. त्‍याला त्‍यांनी मान्‍यता दिल्‍यानंतर याबाबतची तयारी सुरू करण्‍यात आली, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत म्‍हणाले.

गोमेकॉच्‍या जुन्‍या इमारतीसमोर उभारण्‍यात येणाऱ्या स्‍टेजवर २० रोजी दुपारी ३.३० वा.पासून महोत्‍सवाचा उद्‍घाटन सोहळा रंगेल. त्‍यादरम्‍यान सांस्‍कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. त्‍यानंतर जुने सचिवालय ते कला अकादमीपर्यंत चित्ररथ मिरवणूक हो‍ईल.

या मिरवणुकीत एकूण २६ चित्ररथांचा समावेश असेल. त्‍यातील १२ चित्रपट गोव्‍याचे असतील आणि ते राज्‍यातील चित्रपट संस्‍कृतीचे दर्शन घडवतील. तर, इतर ११ चित्ररथ प्रोडक्‍शन हाऊसेसचे असतील, असेही त्‍यांनी नमूद केले.

बुद्धिबळ स्‍पर्धा-इफ्‍फीचा संबंध नाही!

फिडे बुद्धिबळ स्‍पर्धेमुळे यंदाच्‍या इफ्‍फीचा उद्‍घाटन सोहळा श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्‍टेडियवरून रद्द केल्‍याचा समज काही जणांकडून पसरवण्‍यात येत आहे; परंतु ही स्‍पर्धा आणि इफ्‍फी उद्‍घाटनाचा काहीही संबंध नाही, असेही मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोवा पोलिसांकडून पर्यटकांची लूट? महाराष्ट्राच्या पर्यटकानं व्हिडिओ शेअर करत केली पोलखोल, शूटिंग करताच काढला पळ

103 Year Old Man Goa: 'म्हातारा इतुका न अवघें...'! गोव्यातील 103 वर्षांचे धवलक्रांतीदूत; आजही सांभाळतात शेती, राखतात जनावरे

VIDEO: चालता चालता अचानक कोसळले अभिनेते जितेंद्र, चाहते चिंतेत; तुषार कपूरनं दिली हेल्थ अपडेट

Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर गोव्यात अलर्ट! सुरक्षा तपासणीचे आदेश; गर्दीच्या ठिकाणी गस्त

India vs South Africa: एकदिवसीय मालिका तोंडावर असताना भारतीय संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू बाहेर, पाहा कोण?

SCROLL FOR NEXT