Bicholim Civil Supplies Department Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत कार्यालयासाठी जागा अपुरी, नागरिकांची गैरसोय

Bicholim Civil Supplies Department : बऱ्याचदा या कार्यालयातील गर्दी पाहता हे सरकारी कार्यालय की 'कोंडवाडा' असा प्रश्न पडत असतो.

दैनिक गोमन्तक

डिचोली : विविध कामांच्या निमित्ताने सदैव वर्दळ असणाऱ्या नागरी पुरवठा खात्याचा डिचोलीतील कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

बऱ्याचदा या कार्यालयातील गर्दी पाहता हे सरकारी कार्यालय की 'कोंडवाडा' असा प्रश्न पडत असतो. या कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी डिचोलीतील बहुतेक नागरिकांची मागणी आहे.

डिचोलीत सरकारी कार्यालय संकुल इमारतीतील मामलेदार कार्यालयातच एका कोपऱ्यात विभाजन करून छोट्याशा जागेत नागरी पुरवठा खात्याचा कारभार चालत आहे. या कार्यालयात अधिकारी मिळून 12 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टेबल, खुर्च्या व्यवस्थित ठेवण्यास सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यात शिधापत्रिकेवर नावनोंदणी आदी कामांसाठी या कार्यालयात नियमित ये-जा चालूच असते.

बऱ्याचदा या कार्यालयात गर्दी दिसून येत असते. मात्र अपुऱ्या जागेमुळे या कार्यालयात सरकारी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण होत असते. नागरिकांना तासन्तास तिष्ठत राहावे लागते.

नागरी पुरवठा खात्याच्या सध्याच्या कार्यालयात जायचे म्हटले तर वेळ खर्ची घालावा लागतो. कार्यालयात एकाचवेळी चार-पाच नागरिक कामांसाठी आले की गर्दी होते. त्यामुळे अन्य नागरिकांना प्रतीक्षेत राहावे लागते. नागरी पुरवठा कार्यालयासाठी सरकारने स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी.
- उमाकांत प्रभूगावकर, पिळगाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT