Leopard In Goa: धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील वंडाळा गावात धुमाकूळ घालणारा व पाळीव प्राणी फस्त करणारा ब्लॅक पॅंथर बाजूलाच राहिला, पण त्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात रात्री 3 वाजता एक बिबटा मात्र जेरबंद झाला.
कुळे वन विभागचे अधिकारी रवी शिरोडकर याच्या मार्गदर्शनखाली धारबांदोडा वन विभागाने वंडाळा गावात अतुल नाईक यांच्या घरासमोर 14 रोजी सायंकाळी पिंजरा लावलेला होता. मात्र ब्लॅक पॅंथरने आपला मोर्चा तळसाय गावाकडे वळविला.
काल रात्री या भागात बिबट्या आला आणि पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी आत शिरला व फसला. त्याची रवानगी नंतर बोंडला अभयारण्यात करण्यात आली. दरम्यान, गावात अजूनही ब्लॅक पँथरची दहशत कायम आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.