CCTV Dainik Gomantak
गोवा

Ponda News : कचराफेकूंना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावा ! फोंडा येथील नागरिकांची मागणी

Ponda News : विशेषतः हा प्रकार रात्रीच्या वेळी होत असल्याने कचराफेकू सापडत नाही, त्यामुळेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, येथील मध्यवर्ती सदर भागात रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून कचरा टाकण्याचे प्रकार घडत असून हा परिसर ओंगळवाणा होण्यापासून रोखण्यासाठी पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरा लावावा अशी मागणी होत आहे.

हर्षद देसाई यांनी याबाबत फोंडा पालिकेला एक निवेदन सादर केले आहे. सदर भागातील डीके आर्केड परिसरात वीज खात्याच्या ट्रान्सफॉर्मरजवळच मोकळ्या जागी हा कचरा अज्ञातांकडून फेकला जात आहे. विशेषतः हा प्रकार रात्रीच्या वेळी होत असल्याने कचराफेकू सापडत नाही, त्यामुळेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी होत आहे.

प्लास्टिक तसेच अन्य कचऱ्याबरोबरच घर दुरुस्तीवेळी वापरण्यात येणारे टाकाऊ साहित्य, टाकाऊ टाइल्स, कुजके पदार्थ तसेच इतर साहित्य बिनधास्तपणे या ठिकाणी फेकले जात असल्याने हा परिसर ओंगळवाणा ठरला आहे. या कचऱ्याला आग लागल्यास ट्रान्सफॉर्मरलाही धोका आहे, असे हर्षद देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT