CCTV Dainik Gomantak
गोवा

Goa: पोलिस स्थानकांना हवा ‘तिसरा डोळा’

निधीअभावी ‘CCTV’ बसविणे रखडले; मानवी हक्क आयोगाची सरकारला नोटीस

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘उपरवाला सब देख रहा है...’ असे सांगणारी एका सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV) कंपनीची जाहीरात प्रसिद्ध आहे. तुमच्या सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यातून सांगण्यात येते. मात्र, 24 तास सुरक्षा देणाऱ्या राज्यातील सुमारे 80 टक्के पोलिस स्थानकांमध्ये (Police Station) निधीअभावी सीसीटीव्ही बसविण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे. गोवा (Goa) मानवी हक्क आयोगाने हे गांभीर्याने घेत सरकार व पोलिस महासंचालकांनाच नोटिसा बजावल्या आहेत. 22 सप्टेंबर 21 पर्यंत या नोटिशींना उत्तर देण्यास आयोगाने मुदत दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व पोलिस स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती केली आहे. पोलिस स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र ते केवळ शोभेचे ठरत आहेत. यासंदर्भात सरकार व पोलिस प्रमुख गंभीर नाही. सर्वोच्च न्यायालयाने आठ महिन्यांपूर्वी सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना सीसीटीव्हीबाबत आदेश दिलेला आहे. रात्रीच्या वेळीही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसेल अशाप्रकारचे हे कॅमेरे असावेत, तसेच त्यामध्ये चित्रीकरण झालेला डेटा स्टोअर करण्याची क्षमता असणे आवश्‍यक आहे, असेही या आदेशात स्पष्ट केले होते.

मानवी हक्क आयोगाकडून दखल

काही पोलिस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मानवी हक्क उल्लंघन तसेच काही कोठडीतील मृत्यूचे प्रकार उघड झाले नाहीत. या प्रकरणाची आयोगाकडून दखल घेण्यात येत असून या प्रकरणी चौकशी होणे आवश्‍यक असल्याचे निरीक्षण नोटीस जारी करताना आदेशात नोंदवले आहे. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे तसेच सदस्य माजी न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता व सदस्य माजी न्यायाधीश प्रमोद कामत यांनी आदेश जारी केला आहे.

राज्यातील पोलिस स्थानके

राज्यातील उत्तर गोव्यात 12 (पणजी, जुने गोवे, आगशी, म्हापसा, हणजूण, पेडणे, कोलवाळ, पर्वरी, कळंगुट, साळगाव, डिचोली व वाळपई), तर दक्षिण गोव्यात 16 (मडगाव, मायणा - कुडतरी, फातोर्डा, कोलवा, कुंकळ्ळी, केपे, कुडचडे, सांगे, काणकोण, वास्को, वेर्णा, मुरगाव, फोंडा, कुळे, वास्को रेल्वे व दाबोळी विमानतळ) पोलिस स्थानके आहेत. या व्यतिरिक्त किनारपट्टी, क्राईम ब्रँच, सायबर, एएनसी, एटीएस व महिला पोलिस स्थानके मिळून इतर 16 स्थानके आहेत.

50 हजारांच्या आसपास खर्च

पोलिस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सरासरी सुमारे 50 हजाराच्या आसपास खर्च येतो. हा खर्च किती कॅमेरे बसवले आहेत यावरही अवलंबून असतो. पोलिस स्थानकातील आतील तसेच बाहेरील परिसरातील दृश्‍य दिसेल जेणेकरून पोलिस निरीक्षकांना देखरेख ठेवण्यास तसेच पोलिसांवरही गैरकृत्य करण्यापासून वचक बसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT