Margao Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: इन्स्टाग्रामवरून फसवणूक! कुडचडेतील 'त्या' तरुणाच्या जाळ्‍यात अडकल्‍या अनेक युवती; अजून 5 जणांची चौकशी

Instagram scam in Goa: पाजीफोंड-मडगाव येथील ममता जयसिंग राजपूत या युवतीला ३ लाख ३० हजारांचा गंडा घातल्याची तक्रार मडगाव पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साई याला अटक केली होती.

Sameer Panditrao

मडगाव: इन्स्टाग्रामवर मैत्री करून एका २४ वर्षीय युवतीला लाखो रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सध्‍या मडगाव पोलिस ठाण्याच्‍या कोठडीची हवा खाणारा संशयित साई सुनील दळवी (२८) याने अनेक युवतींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याला पुढील तपासासाठी पाच दिवसांची कोठडी घेण्यात आली आहे. त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याच्या प्रयत्नात पोलिस आहेत.

पाजीफोंड-मडगाव येथील ममता जयसिंग राजपूत या युवतीला ३ लाख ३० हजारांचा गंडा घातल्याची तक्रार मडगाव पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साई याला अटक केली होती. संशयित हा कुडचडे येथील मोरेले येथील आहे. चालू वर्षाच्या ४ एप्रिल ते १६ एप्रिल यादरम्यान फसवणुकीची ही घटना घडली होती. पोलिसांनी भारतीय न्‍यायदंड संहितेच्या कलम ३१८ (४) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अंतर्गत संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

ममताला मदतीचे दाखविले आमिष

संशयित साई याने तक्रारदार युवती ममता हिच्‍याशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. त्या युवतीची होंडा ॲक्टिवा दुचाकी होती. आपण त्यासाठी ग्राहक आणू, चांगली रक्कम मिळेल असे भासवून तिला ३ लाख ३० हजार रुपये दे असे सांगितले. स्वतःच्या व अन्य पाच जणांच्या बँक खात्यांवर ही रक्कम भरण्यास सांगितली. ममताने विश्‍‍वास ठेवून पैसे दिले. पण मागाहून आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिने मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

‘त्‍या’ पाचजणांचीसुद्धा चौकशी

पोलिसांनी त्या पाचजणांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली. तपासात त्यांचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे आढळून आले आहे. मात्र साईने त्यांना ‘तुमच्या बँक खात्यावर काही रक्कम जमा होणार असून, ती नंतर मला द्या’ असे सांगितले होते. त्‍यांची जबानी नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli New Look: "दाढी पिकली, 50 वर्षाचा दिसतोस" किंग कोहलीचा नवा लूक व्हायरल, नेटिझन्सनी केलं ट्रोल

Raksha Bandhan: रक्षाबंधनासाठी बाजारपेठा फुलल्‍या!

World Games 2025: चीनमधील 'वर्ल्ड गेम्स 2025'साठी गोव्याच्या शिखा पाठक यांची पंच म्हणून निवड

Ind Vs Eng: ..तो अंडररेटेड क्रिकेटर! मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने केले 'या' खेळाडूचे कौतुक; सांगितली मैदानावरची खासियत

Goa Assembly: "बंगळुरूमध्ये चालतं, मग गोव्यात का नाही?" रात्री 1 पर्यंत रेस्टॉरन्ट सुरू ठेवण्याबाबत सरदेसाईंचा सवाल, CM सावंतांकडून सकारात्मक उत्तर

SCROLL FOR NEXT