Meta high court clarification on Instagram data Dainik Gomantak
गोवा

Instagram Data Secure: ब्लॉक 'इन्स्टाग्राम'चा डेटा सुरक्षित; 'मेटा'ने दिलेे हायकोर्टात स्पष्टीकरण, अपिलावर 3 महिन्यांत निर्णय देण्याचेे निर्देश

Instagram Appeal Decision: सोशल मीडिया नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून ‘मेटा’ कंपनीने ब्लॉक केलेल्या इन्स्टाग्राम खात्यावरील सर्व डेटा सुरक्षित ठेवण्यात येईल, असे स्पष्टीकरण कंपनीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात देण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सोशल मीडिया नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून ‘मेटा’ कंपनीने ब्लॉक केलेल्या इन्स्टाग्राम खात्यावरील सर्व डेटा सुरक्षित ठेवण्यात येईल, असे स्पष्टीकरण कंपनीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात देण्यात आले. दरम्यान, याचिकाकर्ते हर्षद नाईक यांनी अपीलीय प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या अपिलावर तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

स्थानिक इन्फ्लुएन्सर हर्षद नाईक यांनी एका जाहिरातीसंदर्भात केलेली पोस्ट ‘मेटा’च्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे नमूद करत कंपनीने त्यांचे इन्स्टाग्रामसह अन्य मध्यस्थ प्लॅटफॉर्मवरील खाते ब्लॉक केले होते.

या कारवाईविरोधात त्यांनी अपीलीय प्राधिकरणाकडे अपील दाखल केले होते. मात्र, त्यावर वेळेत निर्णय न झाल्याने त्यांनी गोवा खंडपीठात धाव घेतली. अपीलीय प्राधिकरणाला प्रलंबित अपिलावर तातडीने निर्णय देण्याचे निर्देश द्यावेत, तसेच ‘मेटा’ला त्यांचे इन्स्टाग्राम खाते पूर्ववत सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.

४५ हजार प्रकरणे प्रलंबित

सुनावणीनंतर भारताचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ॲड. प्रवीण फळदेसाई यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अपीलीय प्राधिकरणाकडे सध्या अशा स्वरूपाची सुमारे ४५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ९ हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT