Inspector Paresh Naik and Sub Inspector Kiran Naik of Calangute Police Station were transferred Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कारवाईत हयगयीचा ठपका! कळंगुट पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची तडकाफडकी बदली

Inspector Paresh Naik and Sub Inspector Kiran Naik transferred: कळंगुट पोलिस स्थानकाचा अतिरिक्त ताबा पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्याकडे दिला आहे.

Manish Jadhav

पणजी: कळंगुट येथील किनारपट्टी भागात रात्रीच्यावेळी गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये कारवाईत निष्क्रियता दाखवल्याचा ठपका ठेवत कळंगुट पोलिस निरीक्षक परेश नाईक व उपनिरीक्षक किरण नाईक यांची काल रात्री तडकाफडकी ‘उत्तर गोवा राखीव पोलिस’मध्ये बदली करण्यात आली आहे.

मारहाणीची घटना घडल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात तसेच संशयितांना गजाआड करण्यास झालेला विलंब यामुळे कारवाई करण्‍यात आल्‍याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. कळंगुट पोलिस स्थानकाच्या हद्दीत पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण, महिलेचा विनयभंग आणि क्लब डाऊन टाऊनमध्ये झालेला राडा, अशी एकापाठोपाठ तीन प्रकरणे घडली. त्‍यानंतर स्‍थानिकांमध्‍ये असंतोष पसरला असून पोलिसांच्‍या भूमिकेवर संशय व्‍यक्‍त करण्‍यात आला होता.

कळंगुट पोलिस स्थानकाचा अतिरिक्त ताबा पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्याकडे दिला आहे. या प्रकरणी अजून एका अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दरम्यान गोव्यात विशेषतः गोव्यातील किनारी भागांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून दिवसागणिक घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये काहीशी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

बळीचा बकरा: लोबोंची नाराजी

दरम्यान, कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांच्या बदलीबाबत स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना बळीचा बकरा करण्यात आल्याचे लोबो यांनी म्हटले. काही दिवसांत एका पाठोपाठ या मारहाणीच्या घटना घडल्या. त्यांनी शक्य तेवढ्या लवकर कारवाई करुन संशयितांना गजाआडही केले; मात्र त्याची बदली करण्याचे कारण समजत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT