Industrial Pollution X
गोवा

Cuncolim IDC: 'कुंकळ्ळी औद्योगिक' पंचनाम्यात धक्कादायक गोष्टी उघड! अस्वच्छता; कामगारांची गैरसोय, 20 कंपन्यांची तपासणी पूर्ण

Cuncolim IDC Inspection: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कामगारांसाठी असलेल्या अपुऱ्या सुविधांचा पंचनामा कामगार खात्याने सुरूच ठेवला आहे. गेल्या १५ दिवसांत २० कंपन्यांची यासाठी कामगार निरीक्षकांनी तपासणी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim IDC Inspection

पणजी: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कामगारांसाठी असलेल्या अपुऱ्या सुविधांचा पंचनामा कामगार खात्याने सुरूच ठेवला आहे. गेल्या १५ दिवसांत २० कंपन्यांची यासाठी कामगार निरीक्षकांनी तपासणी केली आहे.

कामगार आयुक्त डॉ. लेविनसन मार्टिन्स यांनी काही तक्रारींची दखल घेत ही तपासणी मोहीम राबवणे सुरू केले आहे. यासाठी मडगावमधील दोन कामगार निरीक्षक आणि पणजीतून कामासाठी मडगावला दोन कामगार निरीक्षक पाठवण्यात आले आहेत.

या तपासणीनंतर अहवाल सादर झाल्यानंतर कामगारांची सुरक्षितता, किमान वेतन, कामाच्या ठिकाणची स्वच्छता, कामगारांसाठी असलेली स्वच्छतागृहे, कामगारांसाठी नियमानुसार असणारी विश्रांतीची सोय या मुद्यांच्या आधारे कारवाईचा निर्णय खाते घेणार आहे.

अनेक धक्कादायक गोष्टी उघड

कामगार निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. कामगार उपायुक्त प्रसाद पेडणेकर हे या तपास मोहिमेचे संयोजन करत आहेत. त्यांच्याकडे आलेल्या माहितीनुसार, कामगारांची स्वच्छतागृहे अस्वच्छ असणे, विश्रांतीच्या जागेच्या बदल्यात भंगार ठेवण्याची खोली दाखवणे, कामगारांची अत्यंत गलिच्छ जागेत राहण्याची व्यवस्था करणे, कामगारांनी उघड्यावरच आंघोळ करणे आदी प्रकार या कामगार निरीक्षकांना आढळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तांबोशे झाले आता उगवे! 'ओंकार'मुळे शेतकरी त्रस्त; भातशेती, केळी, पोफळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

Goa Tourist: हुर्रे! 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक; नव्या फ्लाईट्स, क्रूझमुळे फुलले पर्यटन

Goa Live Updates: कोलव्यात क्लिनिकला आग

Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

SCROLL FOR NEXT