Bastoda Panchayat Dainik Gomantak
गोवा

Bastoda Panchayat: बस्तोडा पंचायतीकडून स्टॉल, गाळ्यांची पाहणी

Bastoda Panchayat: बस्तोडा पंचायतीने नुकताच बस्तोडा जंक्शनवरील कथित अवैध स्टॉल्स व गाडेधारकांची पाहणी करीत, या अतिक्रमणाबाबतची वैध कागदपत्रांची तपासणी केली.

दैनिक गोमन्तक

Bastoda Panchayat: बस्तोडा पंचायतीने नुकताच बस्तोडा जंक्शनवरील कथित अवैध स्टॉल्स व गाडेधारकांची पाहणी करीत, या अतिक्रमणाबाबतची वैध कागदपत्रांची तपासणी केली. बस्तोडा पंचायतीने येथील जंक्शनवरील मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या सर्व गाळे व स्टॉल्सना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

गोवा पंचायत राज कायदा १९९४च्या कलम ८२अन्वये जंक्शनवर कार्यरत असलेल्या सर्व गाडे व स्टॉल्स मालकांना पाहणीसंदर्भात नोटीस जारी केली होती. त्यानुसार, गुरुवारी बस्तोडा सरपंच सुभाष मोरजकर यांच्यासह उपसरपंच सुनीता लोटलीकर, पंचायत सचिव स्मिता शेट्ये परब व पंचायत कर्मचाऱ्यांनी जंक्शनवरील सर्व बांधकामांच्या जागेची पाहणी केली.

तसेच, त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केली. याशिवाय संबंधितांकडून अतिक्रमण झाले आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी स्टॉल्स व गाळ्यांच्या प्रत्यक्ष मोजमापही केले. अशा सुमारे 16 बांधकामांची पंचायत मंडळाने पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यातील बहुतांश गाळे व स्टॉल्स तात्पुरत्या एनओसीसह कार्यरत असल्याचे आढळले व त्यांना इतर प्राधिकरणांकडून आवश्यक एनओसी मिळालेली नाही. बस्तोडा सरपंच सुभाष मोरजकर म्हणाले, जंक्शनवरील सर्व बांधकामांना तपासणीसाठी नोटीस बजावली होती व त्यानुसार आम्ही गोवा पंचायत अधिनियम 1994 नुसार तपासणी व आवश्यक कार्यवाही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT