Inspection of Sal River by MLA of Madgaon Dainik Gomantak
गोवा

'साळ नदीला पूर येऊ नये यासाठी नाला सफाईचे काम प्राधान्याने'

मडगाव आणि बाणावली आमदारांकडून पाहणी; पाण्यातील वनस्पती काढून टाकण्याची शिफारस

दैनिक गोमन्तक

मडगाव : पावसात साळ नदीला पूर येऊन मडगाव आणि बाणावली भागातील घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नदीला जोडणाऱ्या सर्व नाल्यांची सफाई प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच साळ नदीच्या खाडीत जी मोठ्या प्रमाणावर पाण वनस्पती वाढली आहे ती पावसापूर्वी छाटून टाकण्याच्या सूचना आज पाटबंधारे खात्यांच्या अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याबरोबर संयुक्त पाहणी केली. त्यावेळी साळ नदीला जोडणाऱ्या कित्येक नाल्यांची अजून सफाई हातीच घेतली नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी नाल्यात मातीचे भराव घातलेले दिसून आले.

हे नाले साफ केले नाहीत तर पावसाळ्यात येथे पाणी फुगून नदीच्या काठावर जी घरे आहेत ती पुराखाली येऊ शकतात हे कामत यांनी या अभियंत्यांच्या नजरेस आणून दिले. त्यामुळे पावसापूर्वी हे सर्व नाले साफ करण्याबरोबरच ज्या ठिकाणी मातीचे भराव आहेत ते काढून टाकणे आणि ज्या ठिकाणी संरक्षक भिंती मोडून पडल्या आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती हाती घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे कामत यांनी सांगितले.

दरम्यान ही परिस्थिती अशीच राहिली तर पावसाळ्यात कोंब परिसर पाण्याखाली जाऊ शकतो याकडे व्हिएगस यांनी लक्ष वेधले. कुठल्याही जलस्त्रोताची व्यवस्थितरीत्या सफाई झाली नसल्याचे कुणा नागरिकांच्या लक्षात आल्यास त्यांनी आपल्या किंवा दिगंबर कामत यांच्या लक्षात हा प्रकार आणून द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT