Goa SGPDA Dainik Gomantak
गोवा

Goa SGPDA: ‘एसजीपीडीए’व पालिकेकडून मासळी मार्केटची पाहणी

Goa SGPDA: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मडगाव नगरपालिकेचे मुख्य़ाधिकारी गौरीश शंखवाळकर, ‘एसजीपीडीए’चे सदस्य सचिव, नगरपालिकेचे अभियंते व अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी मडगावच्या घाऊक मासळी मार्केटची पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

Goa SGPDA: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मडगाव नगरपालिकेचे मुख्य़ाधिकारी गौरीश शंखवाळकर, ‘एसजीपीडीए’चे सदस्य सचिव, नगरपालिकेचे अभियंते व अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी मडगावच्या घाऊक मासळी मार्केटची पाहणी केली.

या संदर्भात बोलताना मुख्याधिकारी शंखवाळकर यांनी सांगितले की, हे घाऊक मासळी मार्केट असून येथे किरकोळ मासळी विक्री करता येत नाही. त्या संदर्भात न्यायालयात प्रश्र्न उपस्थित करण्यात आले होते.

येथील किरकोळ मासळी विक्रेत्यांचा प्रश्र्न कसा सोडवावा या बद्दल पाहणी करुन व नंतर सर्व संबंधितांची बैठक घेऊन उपाययोजना तयार केली जाईल व ९ ऑक्टोबर रोजी न्यायालयाच्या पुढील सुनावणीच्या वेळी सादर केली जाईल,असे मुख्याधिकारी शंखवाळकर यानी सांगितले.

तसेच मार्केटमध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीही आमच्यावर आहे. रस्त्यावर वाहने पार्क केली जातात, त्याबद्दलही उपाययोजना केली जाईल. या घाऊक मासळी मार्केटमधील फळ व भाजी विक्रेत्यांना हटविले आहे. त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी नगरपालिका निरीक्षकांवर टाकण्यात आल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एसजीपीडीए’च्या सदस्य सचिवाने सांगितले की, आमच्या वतीने दोन्ही मार्केटमध्ये स्वच्छता राखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. मडगाव घाऊक मासळी विक्रेते संघटनेचे प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT