केरी: महाराष्ट्रातील तिलारी जैव-क्षेत्रातील जंगलात ड्रोसेरा बर्मान्नी या कीटकभक्षी वनस्पतीची आढळून आलेली आहे. या वनस्पतीला सुंद्यू म्हणून देखील ओळखले जाते.
ड्रोसेरा प्रजाती ही एक लुप्तप्राय मांसाहारी वनस्पती असुन या वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. सुप्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ श्रीरंग यादव यांनी गोव्याच्या (Goa) सीमेपासून थोड्या अंतरावर असलेल्या तिलारी जैव-क्षेत्राला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान या वनस्पतीची ओळख पटली.
ड्रोसेरा बर्मान्नी त्याच्या पानांच्या पृष्ठभागावर आच्छादित असलेल्या श्लेष्मल ग्रंथींचा वापर करून कीटकांना आकर्षित करते, आणि खाते. गोलाकार, लालसर देठ असलेली बेसल पाने ग्रंथी-केसांनी झाकलेली असतात. कीटकांना आकर्षक चिकट पदार्थ बाहेर टाकतात आणि कीटक लवचिक देठाच्या ग्रंथीद्वारे पकडले जातात; नवीन बळी पकडण्यासाठी नंतर पाने पुन्हा उघडतात. ऐनोडे येथील तिलारी (Tilari Dam) भागात शेत असलेले दोडामार्ग (Dodamarg) येथील एका व्यक्तीने दिलेल्या माहिती नुसार, ड्रोसेरा बर्मान्नी प्रजातीची वनस्पती असुन या वनस्पतीबद्दल आम्हाला अद्वितीय वैशिष्ट्य आणि पर्यावरणशास्त्रातील तिची भूमिका समजली. ही प्रजाती साधारणपणे जमिनीतील नायट्रोजनच्या प्रमाणावर अवलंबुन असते ज्या भागात कमी नायट्रोजन असते अशा ठिकाणी ही वनस्पती (Plant) जास्त आढळते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.