Air India Flight Dainik Gomantak
गोवा

INS Hansaच्या शिरपेचात मानाचा तुरा; दक्षिण आशियात गौरव

गगन उपग्रह प्रणालीवर आधारित आरएनपी ऍप्रोचसह पहिला संरक्षण तळ

दैनिक गोमन्तक डिजिटल

आयएनएस हंस हा ‘आवश्यक दिशादर्शक कार्यक्रम’ (आरएनपी) ऍप्रोच तंत्रज्ञानाने युक्त होणार असलेला  दक्षिण आशिया-प्रशांत प्रदेशातील पहिला संयुक्त वापराचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बनला आहे.

आरएनपी ऍप्रोचमुळे दिशादर्शनासाठी अतिउच्च वारंवारतेचा ऑम्निडायरेक्शनल (सर्व दिशांना प्रसारित करणारा) रेडियो  आणि इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टिम  यांसारख्या जमिनीवरील उपकरण प्रणालीवरील अवलंबित्व कमी होईल.

भारतीय नौदल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण  यांच्या समर्पित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही क्षमता साध्य करण्यात यश आले आहे. एएआयच्या अधिकाऱ्यांनी आयएनएस हंस आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यात लेटर ऑफ ऍग्रीमेंट  करण्यासाठी 7 व 8 एप्रिलला या विमानतळाला भेट दिली होती.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान या अधिकाऱ्यांनी आयएनएस हंसच्या सर्व इन्स्ट्रूमेंट ऍप्रोच प्रक्रिया सुधारित करण्याचा  आणि दोन्ही धावपट्ट्यांसाठी आरएनपी ऍप्रोचची रचना करण्याचा प्रस्ताव दिला. या विमानतळावर एक इन्स्ट्रूमेंट प्रोसिजर डिझाईन कोर्स  प्रशिक्षित अधिकारी तैनात करण्यात आला आहे.

उड्डाण चाचण्या समाधानकारक

एएआयने आयएनएस हंससाठी (दाबोळी विमानतळ) धावपट्टी २६ साठी भारतीय उपग्रहाच्या जीपीएस एडेड जिओ ऑगमेन्टेड नेव्हिगेशन (गगन) आधारित आरएनपी एप्रोचची देखील रचना केली आणि यावर विमानतळाच्या सामग्रीच्या मदतीने समाधानकारक उड्डाण चाचण्याही करण्यात आल्या.

जमिनीवरील उपकरणांवर अवलंबित्व कमी

आरएनपी ऍप्रोचमुळे श्रेणी-१ मधील इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टिमची अचूकता उपलब्ध होईल. त्यामुळे उपरोल्लेखित सामग्री सेवेसाठी उपलब्ध नसताना किंवा देखभाल-दुरुस्ती सुरू असतानाही उड्डाण प्रक्रिया विनाअडथळा सुरू राहण्यास मदत होईल. आयएनएस हंसच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Goa Live Updates: नाणूस येथील सभागृहाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT