पणजी: सहकारी महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्या निर्दोषत्वाला सरकारने आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी आजपासून सुरू झाली. या आव्हान अर्जाच्या प्रक्रियेत त्रुटी आहेत, असा युक्तिवाद तेजपालचे वकील अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर केला. ही सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती उद्या मंगळवार दि. 12 रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.
तरुण तेजपाल याला म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष ठरविल्यांतर सरकारने त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आज ही सुनावणी सुरू झाली. एखाद्या निर्दोषत्वाला आव्हान देण्याबाबत सरकारी वकिलांनी मतप्रदर्शन व्यक्त केल्यानंतर सरकारने तो सादर करायचा असतो, मात्र याबाबतीत तसे झालेले नाही.
निवाडा हाती मिळण्यापूर्वीच व त्यात न्यायालयाने केलेल्या निरीक्षणाची माहिती घेण्यापूर्वीच घाईघाईने निर्दोषत्वाला आव्हान दिले आहे असा युक्तिवाद देसाई यांनी केला.
फौजदारी दंड संहितेच्या कलम 378 खाली निर्दोषत्वाला आव्हान देण्यात आले आहे. हे आव्हान देण्यापूर्वी निवाड्यातील न्यायालयाने गृहित धरलेल्या मुद्यांबाबत सरकारी वकिलांनी मतप्रदर्शन केल्यानंतरच सरकारने निर्णय घ्यायचा असतो अशी प्रक्रिया आहे. मात्र यामध्ये कोणताही विचार न करता आव्हान देण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने 21 मे 2021 रोजी तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा निवाडा दिला होता. हा निवाडा देताना न्यायालयाने संशयिताला निर्दोष ठरवत असल्याचे इतकाच उल्लेख न्यायालय सभागृहात केला होता व त्याची कारणे उघड केली नव्हती. 25 मे रोजी राज्य सरकारला निवाड्याची अधिकृत प्रतमिळाली, मात्र 24 मे 2021 रोजी सरकारने या निवाड्याविरुद्ध आव्हान याचिका उच्च न्यायालयात सादरकेली होती. त्यानंतर 27 मे 2021 रोजी पहिल्यांदा ती उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.