Union Home Minister Amit Shah Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील एसटी समाजावर 20 वर्ष अन्याय ; डिलिमीटेशन आयोगासाठी मंत्रीमंडळ ठराव घेण्याचे अमित शहांचे आश्वासन

ST Reservation: राजकीय आरक्षणासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे मागणी केली होती.

Ganeshprasad Gogate

ST Reservation: राजकीय आरक्षण नसल्याने गोव्यातील एसटी समाजावर गेली २० वर्षे अन्याय झाला असून पुढील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एस्टींना राजकीय आरक्षणासाठी डिलिमीटेशन आयोग स्थापण्याचा ठराव घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गोव्याच्या शिष्ठमंडळाला आश्वासन दिल्याची महत्वाची माहिती हाती येतेय.

आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी मतदारसंघ फेररचना आयोग स्थापन करावा या महत्वाची मागणी राज्य सरकार तर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे केली होती.

आणि आता गृहमंत्री अमित शहांनी आयोग स्थापण्याचा ठराव घेणार असल्याचे सांगितल्याने एसटी समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

राज्यातील गावडा, कुणबी आणि वेळीप या जमातींना आदिवासी म्हणून विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासमोर सादर करण्यात आली होती.

दरम्यान या विषयाच्या अनुषंगाने धनगर समाजालाही आरक्षण लागू होण्यासंबंधीचे सुतवाच धनगर समाज नेते बाबू कवळेकर यांनी केले आहे.

डिलिमीटेशन आयोगाचे मिळालेले आश्वासन खरे असून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या प्रश्नांसंबंधी केलेली मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.

कदाचित 2027 च्या अगोदरही आरक्षण लागू होण्यासंबंधीचे सुतवाच करण्यात आले असल्याचे धनगर समाजाचे नेते बाबू कवळेकर यांनी गोमंतकशी बोलताना सांगितले

गोव्यातील अनुसूचित जमातीसाठी विधानसभेत चार मतदारसंघ राखीव ठेवण्याबाबत अधिसूचना काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सात दिवसांची मुदत देत असल्याचा इशारा एसटी समाजातर्फे देण्यात आला होता.

सरकारने प्रतिसाद न दिल्यास लोकसभा निवडणुकांबाबत भूमिका ठरविण्यासाठी आदिवासी पंचायत घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे एसटी समाजातर्फे सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT