Demolition at Anjuna Le Gala Resort: काही दिवसांपासून किनारीभागातील बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध पर्यटन खात्यासह सीआरझेडनेही कारवाई सुरु केली असून वागातोरनंतर आज शुक्रवारी हणजूण येथे बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई केलीय.
हणजूणमधील अनिल मडगावकर यांच्या मालकीच्या ले गाला रिसॉर्टमधील बेकायदा बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केल्याची माहिती समोर येतेय. बांधकाम नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी या रिसॉर्टवर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजतेय.
या कारवाईवेळी तब्बल 20 कॉटेज आणि एक रिसेप्शन काउंटर तसेच ग्राउंड प्लस वन फॅब्रिकेटेड रेस्टॉरंट जमीनदोस्त करण्यात आलेय.
या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रिसॉर्टवर उपविभागीय दंडाधिकारी एल. राजेश एस. आजगावकर यांच्या देखरेखीखाली, बार्देश, म्हापसा येथील ब्लॉक विकास अधिकारी यांनी ही कारवाई केल्याचे समजतेय.
यावेळी सुरक्षितता म्हणून उत्तर गोवा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आणि महिला पोलीस हवालदारांचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाची पथके यावेळी घटनास्थळी उपस्थित होती.
बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध किनारपट्टीलगतच्या CRZ मधील शॅक, रेस्टोरंटसारख्या बांधकामाबाबत प्रशासन अलर्ट मोडवर असून संबंनधत विभाग याविरुद्ध कारवाई करत असल्याचे सध्या दिसून येतेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.