Bull Fight Dainik Gomantak
गोवा

Bull Fight: लोकांची हौस मुक्या प्राण्याच्या जीवावर बेतली; बेताळभाटी येथील धिरयोत बैलाचा मृत्यू Video

Bull Fight Goa: धीरयोचा बैलाचा मृत्यू झाल्याची बातमी पसरल्यानंतर पोलिसांचीही तारांबळ उडाली. कोलवा पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Bull Fight Goa

मडगाव: बेताळभाटी येथे आयोजित धीरयोत एक बैल मृत्युमुखी पडला. सोमवारी (ता.२८) ही घटना घडली. या झुंजीत ३० लाखांचा सट्टा लावण्यात आला होता. यात आयोजकांनी दोन मातब्बर बैल रिंगणात उतरविले होते. दरम्यान, धीरयो आयोजित केल्याप्रकरणी आता कोलवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बैलाचा मृत्यू झाल्यानंतर आयोजकांनी धीरयो आटोपता घेऊन बघ्यांनाही परत पाठविले. मागाहून धीरयोचा बैलाचा मृत्यू झाल्याची बातमी पसरल्यानंतर पोलिसांचीही तारांबळ उडाली. कोलवा व वेर्णा पोलिस ठाण्याचेही पोलिस घटनास्थळी पोहोचले.

पुढील पोलिस तपास सुरू आहे. बैलांच्या झुंजेचा एक व्हिडिओ समोर आला असून, बैलांची झुंज सुरु असताना सभोवताली मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

बैलांची झुंज सुरु असताना एक बैल अधिक आक्रमक झाला व दुसऱ्या बैलावर जोरदार प्रहार केला. यात दुसरा बैल गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे. जखमी झालेल्या या बैलाचा मृत्यू झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत आता तपास सुरु केला आहे.

दरम्यान, सासष्टीत मोठ्या प्रमाणात या दिवसांत धीरयोंचे आयोजन केले जात असून, त्यावर कारवाई करण्यास पोलिसांना मात्र अपयश येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT