Sewerage Project Dainik Gomantak
गोवा

नव्याने बांधण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पांचे काम ठप्प; पर्यावरण खात्याकडून माहिती

गेल्या महिन्यापासून एक टक्काही प्रगती नाही

दैनिक गोमन्तक

कवळे, कोलवा, म्हापसा आणि पर्वरी येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे. गेल्या महिन्यापासून या प्रकल्पांच्या कामात एक टक्काही प्रगती झालेली नाही. स्वच्छ गंगा राष्ट्रीय मोहिमेंतर्गत केंद्रीय मंत्रालयाला दिलेल्या मासिक अहवालात राज्याच्या पर्यावरण खात्याने ही माहिती दिली आहे.

या माहितीनुसार, कवळे येथील १५ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाचे बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाला जोडणाऱ्या वाहिन्यांचे कामही ९९ टक्के पूर्ण झाले आहे. तरीही गेल्या महिन्यापासून या कामात प्रगती झालेली नाही. कोलवा येथे ७.५ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून जोडणाऱ्या वाहिन्यांचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प चाचणी स्वरूपात चालवून पाहण्यात आला आहे.

म्हापसा येथील 5.4 दशलक्ष लिटर्स क्षमतेचा प्रकल्प 98टक्के पूर्ण झाला आहे. बागा येथील ५.६ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून घरोघरी जोडणी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पर्वरी येथे २० दशलक्ष लिटर्स

प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाचे

बांधकाम केवळ ५ टक्के पूर्ण झाले आहे. वाहिन्या टाकण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर हे काम रेंगाळले आहे.

प्रस्तावित प्रकल्पांची स्थिती

उंडीर येथे १५ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या प्रकल्पाचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे सुरूच होऊ शकलेले नाही. तेथे वाहिन्या टाकण्याचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम सुरू झाल्यापासून १६ महिन्यांत पूर्ण होणार आहे.

कुर्टी येथे ८ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने तेथेही बांधकाम होऊ शकलेले नाही. तेथे वाहिन्या टाकण्याचे काम ९२ टक्के पूर्ण झाले आहे. कुडचडे येथे २० दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या प्रकल्पासाठी भू-संपादन करण्यात आले आहे. वाहिन्या टाकण्याचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे.

सुरू असलेले क्षमता प्रत्यक्षातील वापर

प्रकल्प (दशलक्ष लिटर्समध्ये)

  • शिरवडे-नावेली २० २६

  • वास्को २० १३

  • दुर्भाट १ ०.४०

  • जीएमसी १.३५ ०.५०

  • सांकवाळ १ १

  • साखळी ०.८ ०.१५

  • टोंक-पणजी १२.५ १५.०८

  • शिरवडे-नावेली ६.७० ६.७०

  • पाटो-पणजी २ १.८०

  • एकूण ७८.३५ ८०.७१

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

Rama Kankonkar Assault: जोपर्यंत खऱ्या सूत्रधाराला अटक होत नाही, तोपर्यंत पोलिसांवर विश्वास नाही - रामा काणकोणकर

कसोटी सामन्यात 'Love Story'चा ट्विस्ट, दिल्लीची 'ती' सुंदर मुलगी शुभमन गिलच्या प्रेमात; 'I Love You Shubman' पोस्टर झाले व्हायरल

Crime News: धक्कादायक! वर्गमित्राने जेवणाच्या बहाण्याने बाहेर नेलं, मग आणखी दोघे आले अन्... MBBSच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT