जलसंचय करण्यासाठी राज्यात शंभर बंधारे बांधण्याचे नियोजन; 50 जागांची निवड

जलस्रोतमंत्री : डिसेंबरमध्‍ये निविदा; 3 महिन्यांत आराखडे, अंदाजपत्रक
सुभाष शिरोडकर
सुभाष शिरोडकरDainik Gomantak
Published on
Updated on

जलसंचय करण्यासाठी राज्यात शंभर बंधारे बांधण्याचे नियोजन असले तरी 50 ठिकाणी जागांची निवड करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरमध्ये या बंधाऱ्यांसाठी निविदा मागविण्यात येतील, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज पर्वरी येथे मंत्रालयात सांगितले. येत्या तीन महिन्यांत बंधाऱ्यांचे आराखडे तसेच अंदाजपत्रक तयार करणे आदी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील असेही ते म्हणाले.

सुभाष शिरोडकर
Goa Tourism: गोव्याचा निसर्ग घालतोय पर्यटकांना साद! नेत्रावळीतील धबधबे पर्यटकांसाठी खुले

राज्य सरकारने यंदा 100 बंधारे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते काम कुठवर आलेय, अशी विचारणा केल्यावर शिरोडकर म्‍हणाले की, याबाबत आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक घेतली होती. त्‍या बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार बंधारे बांधण्यासाठी 50 जागांची निवड करण्यात आली आहे. या जागा विविध तालुक्यांत आहेत. त्या जागांवर जानेवारी, फेब्रुवारीत बंधाऱ्यांचे काम सुरू व्हावे असे नियोजन करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे जानेवारी ते मेपर्यंत बंधाऱ्यांचे काम व्यवस्थित करता येते. कारण त्या काळात पाऊस नसतो आणि पाण्याचा प्रवाहही मंदावलेला असतो.

बंधाऱ्यांना लोकांचा तसा विरोध नाही. दोन ठिकाणी विरोध झाला हे खरे आहे. लोकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारला आपले काम करायचे असते म्हणून 144 कलम लावून ते करावे लागते. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण सरकार करत आहे, ते करावेच लागणार. 144 कलम काही लग्ने लावण्यासाठी वापरात आणता येत नाही तर सरकारी कामात अडथळा नको म्हणून ते वापरावे लागते.

सुभाष शिरोडकर
सरकार ‘इलेक्शन मोड’मध्ये; घरगुती गॅस सिलिंडर केले एवढे स्वस्त...

अभियंत्यांनी दोन-तीन वेळा तेथे जाऊन सादरीकरण केले आहे. साध्या कामाला विरोध होऊ लागला, महामार्ग नको, पूल नको असे लोक म्हणू लागले तर सरकारने काय करावे, असा सवाल शिरोडकर यांनी केला. महामार्ग रुंदीकरणात जी चार घरे जाणार आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.

भाटीकरांचे ते वैयक्तिक मत : ढवळीकर

कुर्टी येथे बंधाऱ्याला विरोध होत आहे. त्यावर मगोचे फोंड्यातील नेते केतन भाटीकर यांनी लोकांच्या बाजूने भाष्य केल्याकडे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे लक्ष वेधले असता ते म्‍हणाले की, भाटीकर यांचे ते म्हणणे वैयक्तिक आहे. मगो पक्ष सरकारमध्ये असल्याने सरकारच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे. या बंधाऱ्याच्या निर्णयापूर्वी मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली होती. खांडेपार बुडले तेव्हा मगोचे कार्यकर्ते वावरले. तेथे आम्ही विविध माध्यमांतून घरे बांधून दिली. असे असतानाही तेथे ‘आरजी’ला 275 मते मिळाली, ती एकतर आम्हाला किंवा भाजपला किंवा काँग्रेसला मिळायला हवी होती. लोकांना विकासकामांची गरज नाही हेच यातून दिसते. भाटीकर यांना तेथे जा किंवा जाऊ नका असे सांगितलेले नाही व सांगणार नाही. सर्व परवानग्या घेऊन केल्या जाणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणे योग्य नव्हे, असेही ढवळीकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com