New Market  Dainik Gomantak
गोवा

Gnesh Chaturthi: यंदाच्या गणेश चतुर्थीवर महागाईचे सावट; चौरंग दरात वाढ

लाकूड वधारले : वाढत्या मजुरीचाही परिणाम : 700 वरून थेट एक हजारांवर मूल्य

दैनिक गोमन्तक

पणजी: श्री गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली असून विविध प्रकारचे साहित्य खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी होत आहे. यंदा गणेशमूर्ती विराजमान करण्यासाठी लागणारे पाट आणि चौरंग यांच्या किमती बऱ्याच वाढल्याचे दिसून आले. गणपतीची मूर्ती काहीजण पाटावर तर काहीजण चौरंगावर बसवितात. मात्र, यंदा नव्या पाटांच्या तसेच चौरंगाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

(Inflation rate on Ganesh Chaturthi this year in goa)

पाटाच्या आकाराप्रमाणे, त्याच्यावरील कलाकुसरीनुसार आणि त्यासाठी वापरलेल्या लाकडानुसार पाटाची किंमत ठरते. गेल्या वर्षी जे पाट 600 ते 700 रुपयांना मिळायचे, त्याच पाटांची किंमत आता 900 ते 1 हजार रुपयांवर पोहोचली आहे. मोठ्या आकाराचे पाट 2500 ते 3 हजार रुपये जोडी या दराने विकले जात आहेत. सागवान, फणस, शिसम लाकडापासून बनविलेल्या पाटांची किंमत त्याहूनही अधिक आहे. कारागिरांची मजुरी वाढली असून लाकूडही महाग झाल्याने दर वाढले, असे पाट, चौरंग विक्रेते सांगतात. मॉल, कापडांची दुकाने तसेच गणेश पूजेसाठी, तसेच सजावटीचे साहित्य, फटाके यांची दुकाने सजली आहेत.

पडदे, रोषणाईच्या माळांना मागणी

अष्टमीच्या फेरीतून सजावटीसाठी लागणारे साहित्य, कपडे तसेच सोफा सेट, विविध प्रकारची भांडी, कपाटे, टेबल क्लॉथ लोक खरेदी करत आहेत. कृत्रिम फुलांचे हार, विविध प्रकारचे पडदे, रोषणाईच्या विद्युत माळा, थर्माकोलचे मखर, पताका यांना मागणी आहे. हारांची किंमत आकाराप्रमाणे, तसेच दर्जानुसार 100 ते 2 हजार रुपयांपर्यंत आहे. पूजेचे साहित्यही येथे उपलब्ध आहे.

फराळाचे खाद्यपदार्थही उपलब्ध : चतुर्थीनिमित्त लागणाऱ्या नेवऱ्या (करंज्या), लाडू, शंकरपाळी व इतर गोड पदार्थ बाजारात विक्रीसाठी आले असून करंज्या 10 ते 15 रुपये प्रतिनग, लाडू 60 रुपये पाकिट अशा दरात विकले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT