Karnataka Election Result 2023: PM Narendra Modi | Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात ‘तीन-म’ फॅक्टरची किमया

महागाई, मोफत सिलिंडर आणि म्हादईच्या बाजूने मतदान

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Election Result 2023 कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला जे यश मिळाले, त्यामागे बरीच कारणे असतीलही. परंतु तेथे प्रचाराचे मुख्य मुद्दे राहिले ते महागाई, मोफत सिलिंडर आणि म्हादई. या ‘तीन-म’ फॅक्टरचा कर्नाटकातील बहुतांश मतदारसंघांत काँग्रेसला फायदा झाला.

मुळात कर्नाटकातील जनता भाजपवर प्रचंड नाराज होती. 40 टक्के कमिशनला वैतागली होती. त्याशिवाय काँग्रेसने येथील जनतेला पाच महत्त्वाची आश्‍वासने दिली. त्यातच राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचाही परिणाम झाला.

महागाईमुळे जनता त्रासली आहे, हाच मुद्दा कर्नाटकात काँग्रेस नेते जनतेपर्यंत नेण्यात यशस्वी ठरले. महागाई कमी करण्यासह मोफत सिलिंडर देण्याची ग्वाही भाजपने जाहीरनाम्यात दिली होती. कर्नाटक निवडणुकीपूर्वी गोव्यात हाच मुद्दा भाजपला फायदेशीर ठरला होता; परंतु हे आश्‍वासन भाजपने पाळले नाही.

कर्नाटकातील अनेक लोक गोव्यात राहतात. यंदा 40 हजारांहून अधिक मतदार गोव्यातून कर्नाटकात मतदानासाठी गेले होते. त्यांनाही भाजपने कसे फसविले याची नक्कीच जाण असावी. शिवाय काँग्रेसचे जे नेते गोव्यातून कर्नाटकात गेले, त्यांनीही फसव्या जाहीरनाम्याचा प्रचारासाठी योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला.

विचारमंथन करावे लागणार!

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, कर्नाटकातील निकालाने भाजपला नक्कीच धडा शिकविला आहे. लोकांना काँग्रेस हवी म्हणून मतदान झालेले नाही. भाजपच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा निकाल आहे.

आता पक्षाने फेरविचार, विचारमंथन करणे अपेक्षित आहे. भाजपने म्हादईच्या मुद्द्याचा फायदा तेथे घेतला. तो घेतला नसता तर आणखी फटका बसला असता. भाजपचे वेगळेपण नष्ट झाले आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले.

भाजपला खोटारडेपणा भोवला

महागाई महत्त्वाचा मुद्दा आहेच; परंतु मोफत सिलिंडरविषयी गोव्यात जसा खोटारडेपणा केला, तसा भाजप कर्नाटकातही करू लागला. म्हादईचा विषय हा काही भागांपुरता मर्यादित असला तरी भाजप सरकारने केंद्रात सत्ता असतानाही त्याविषयी काही केले नाही. त्यामुळेच भाजपविरोधी मतदान झाले असावे, असे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT