Vegetable Prize Hike Dainik Gomantak
गोवा

Goa News: फलोत्पादन महामंडळाच्या केंद्रात दिव्याखाली अंधार !

Goa News: ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष : निकृष्ट भाज्या विक्रीस

दैनिक गोमन्तक

Goa News: फलोत्पादन महांडमळाच्या मुख्यालय असलेल्या करंजाळे येथे असलेल्या केंद्रात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कुणाचेच तेथे लक्ष नाही. कोमेजलेली भाजी, बुरशी आलेली फळे पडून आहेत. मात्र ती काढून टाकून स्वच्छ फळे, भाजी पुरविण्यात येत नसल्याची अनेक ग्राहकांची तक्रार आहे. गाळ्यातील भाज्यांची योग्य काळजी न घेता गप्पा-मारण्यातच कर्मचारी व्यग्र दिसतात.

जेथे स्वतः महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई, अध्यक्ष प्रेमेंद्र शेट बसतात, तेथेच असा प्रकार घडत असल्याने फलोत्पादन महामंडळाच्या दिव्याखालीच अंधार असे बोलले जात आहे. राज्यातील सर्व महामंडळांनी स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न करावेत, अन्यथा तोट्यातील महामंडळे बंद करू, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले होते.

त्यामुळे तोट्यातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे काय होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. परंतु प्रत्यक्षात कर्मचारी हे सरकारी जावयाप्रमाणे कार्य करत असल्याचे दिसून येते. त्यांना महामंडळाच्या नफ्या-

तोट्याचे काही देणेघेणे नाही. दर महिन्याला त्यांच्या खात्यात ‘काम कर अथवा ना कर’ पगार पडत असल्याने कुणालाच काही सोयरसुतक नाही.

तक्रार कुणाकडे, कशी करावी ?

फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रमेंद्र शेट तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रात अचानक भेट देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. अनेक गाळ्यांमध्ये योग्य प्रकारे भाजी पुरविली जात नाही. तसेच महामंडळाद्वारे तक्रारीसाठी जारी करण्यात आलेला दूरध्वनी क्रमांक कुठल्याच केंद्राच्या बाहेर प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे आपण अशा प्रकाराबाबत महामंडळाकडे तक्रार करू शकतो याची माहिती कुणाला नाही.

ती भाजी, फळे कुणी खायची ? :

गाळ्यामध्ये कोमेजलेल्या भाज्या, बुसशी आलेली फळे, मऊ झालेले पपई, बीट, शेळपटलेले कोबी अशा प्रकारची भाजी कोणी खायची ? त्यासोबतच असली भाजी मूळात कर्मचारी विक्रीसाठी ठेवतात तरी कसे, याबाबत कारवाई होणे गरजेचे असल्याचे ग्राहकांचे मत आहे.

आमच्या गाळ्यांवर मंगळवारी आणि शुक्रवारी भाजी विक्री होत नाही. त्या दिवशी ताजी भाजी आमच्याकडे येत नसते. त्यामुळे आम्ही शक्यतो विक्री करत नाही, या दिवशी उर्वरीत जी भाजी असते ती आम्ही जर कुणाला हवीच असेल तर निम्म्या दराने विकतो.
-चंद्रहास देसाई, गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT