Flight To Goa Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: उन्हाळ्यात भोपाळवरुन गोव्याला थेट विमानसेवा, वेळापत्रकात पुण्याचा समावेश नाही

Flights To Goa: इंडिगो आणि एअर इंडियाने उन्हाळी वेळापत्रकात पुण्यासाठी थेट उड्डाणांचा समावेश केलेला नाही.

Pramod Yadav

Flights To Goa

यंदाच्या उन्हाळी हंगामात भोपळच्या राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट पुणे विमानसेवा सुरू होण्याची आशा जवळपास संपृष्टात आली आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने उन्हाळी वेळापत्रकात पुण्यासाठी थेट उड्डाणांचा समावेश केलेला नाही.

पण गोवा, लखनौ, बेंगळुरू या शहरांसाठी थेट उड्डाणे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात नफा दिसला, तर ही उड्डाणे सुरू ठेवली जातील, अन्यथा ती बंदही होऊ शकतात, विमान कंपन्यांनी म्हटले आहे.

इंडिगोची भोपाळ-बेंगळुरू संध्याकाळची फ्लाइट 6 मार्चच्या संध्याकाळपासून सुरू होणार आहे. यासाठी 6,790 रुपये प्रवासभाडे आकरले जाणार आहे.

तर, 31 मार्चपासून इंडिगो भोपाळ ते लखनऊसाठी फ्लाइट सुरू करणार आहे. ही फ्लाइट आठवड्यातून चार दिवस रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार चालेल. यासाठी फ्लाइट बुकिंग सुरु झाले आहे. या उड्डाणाच्या संचलनामुळे भाविकांना अयोध्याधामकडे जाणेही सोपे होणार आहे.

इंदूरच्या फ्लाय बिग कंपनीने डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनकडे रीवा आणि दतियासाठी फ्लाइट सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

भोपाळ विमानतळापासून रीवा आणि दतियापर्यंत छोटी विमाने चालवली जातील. प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये, जबलपूर, उज्जैन आणि रायपूरशीही जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

उन्हाळी वेळापत्रकात अनेक शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू आहेत. कंपन्याही लवकरच नवीन शहरांची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे, असे विमानतळ संचालक रामजी अवस्थी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT