Antarctica research from Vasco Dainik Gomantak
गोवा

Antarctica Research Vessel: नॉर्वे नाही कलकत्ता! अंटार्क्टिका संशोधनासाठी स्वदेशी बनावटीची नौका; मुरगाव बंदरातून होणार रवाना

Kolkata-built research vessel At Mormugao: वास्को येथील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रासाठी खास जहाज बांधणी कोलकाता येथे सुरु करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: अंटार्क्टिकामध्ये संशोधनासाठी आता स्वदेशी जहाजातून मुरगाव बंदरातून रवाना होता येणार आहे. वास्को येथील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रासाठी खास जहाज बांधणी कोलकाता येथे सुरु करण्यात आली आहे.

आतापर्यंत अंटार्क्टिकापर्यंत पोचण्यासाठी विदेशी, विशेषतः नॉर्वेच्या जहाजांवर अवलंबून राहावे लागत होते. भारताची संशोधन मोहीम अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी नॉर्वेची जहाजे भाड्याने घेतली जात होती. मात्र, आता या परावलंबनाचा शेवट होणार असून भारताचे पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधले जात आहे.

कोलकात्यात गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड आणि नॉर्वेच्या कॉन्ग्सबर्ग या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला असून, यामुळे भारतातच ध्रुवीय क्षेत्रासाठी संशोधन जहाजाची निर्मिती होणार आहे. यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून, ध्रुवीय महासागर संशोधनात भारताची स्वयंपूर्णता वाढणार आहे.

ध्रुवीय महासागर संशोधनाला चालना

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड या सरकारी जहाजबांधणी कंपनीने युद्धनौका, सर्वेक्षण व संशोधन जहाजांची यशस्वी निर्मिती केली आहे. कोलकात्याच्या यार्डमध्ये हे ध्रुवीय जहाज बांधले जाणार असून, हे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असेल. भारतीय संशोधकांना आता स्वतःच्या जहाजावरून अंटार्क्टिकामध्ये संशोधन करता येईल. पर्यावरणातील बदल, सागरी परिसंस्था आणि हवामानविज्ञान यांचे अध्ययन सुलभ होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

SCROLL FOR NEXT