Anthony Rebello  Dainik Gomantak
गोवा

Anthony Rebello Passed Away: माजी फुटबॉलपटू अँथनी रिबेलो यांचे निधन

भारताचे आंतरराष्ट्रीय बचावपटू ः गोव्याचे पहिले संतोष करंडक विजेते

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय फुटबॉलमध्ये 1970-1980 कालावधीत सर्वोत्तम बचावपटू गणले गेलेले माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अँथनी रिबेलो याचे सोमवारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.

(India's Former Football Player Anthony Rebello Passed Away)

अँथनी रिबेलो यांनी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1982 साली मलेशियातील कुआलांलपूर येथे झालेल्या मेर्डेका कप स्पर्धेत, तसेच दक्षिण कोरियातील सोल येथे झालेल्या प्रेझिडन्ट कप स्पर्धेत ते भारतीय संघातून खेळले. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची संधी थोडक्यात हुकली.

गोव्याने 1983-84 मध्ये सर्वप्रथम संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकली. त्या यशात अँथनी रिबेलो यांचे बचावफळीतील योगदान महत्त्वपूर्ण ठरले.विशेष बाब म्हणजे, त्या स्पर्धेत गोव्याने एकही गोल स्वीकारला नव्हता.

गोमंतकीय फुटबॉलमध्ये त्यांचा खास चाहतावर्ग होता. 1977 ते 1987 या कालावधीत 11फुटबॉल मोसमात त्यांनी मातब्बर साळगावकर फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले. बचावफळीत भक्कम खेळ करणारे अँथनी हेडिंगवर शानदार गोल करण्यात पटाईत होते.

कुडतरी येथील सेंट झेवियर्समध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या अँथनी रिबेलो यांची खेळाडू या नात्याने कारकीर्द 1974 साली सीनियर विभागातील मांडवी शिपयार्ड स्पोर्टस क्लबतर्फे झाली. तीन वर्षानंतर (1977 मध्ये) त्यांना साळगावकर क्लबने करारबद्ध केले.

या संघाच्या बचावफळीत त्यांचा ऑस्कर रिबेलो, डेरिक परेरा व नॉर्बर्ट गोन्साल्विस यांच्यासमवेत खेळ खुलला. 1987 मध्ये गुडघाच्या दुखापतीमुळे त्यांना फुटबॉलमधील कारकीर्द आटोपती घ्यावी लागली. निवृत्तीनंतर ते कुवेतमध्ये सुमारे दोन दशके कार्यरत राहिले.

फुटबॉल महासंघाला दुःख

माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अँथनी रिबेलो यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे, सचिव डॉ. शाजी प्रभाकरन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. `‘रिबेलो भारतीय फुटबॉलमधील एक कौशल्यसंपन्न आदरयुक्त बचावपटू होते.

शेवटपर्यंत हार मानायची नाही, लढायचे हीच त्यांची जिद्द असे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सामील आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,’’ असे चौबे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. सेंट्रल डिफेंडर या नात्याने रिबेलो फुटबॉल उत्कटतेने खेळले, त्यामुळेच स्थानिक फुटबॉलमध्ये त्यांनी कित्येक वर्षे दबदबा राखला.

भारतीय फुटबॉलला त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख होत आहे, असे डॉ. प्रभाकरन यांनी म्हटले आहे. गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कायतान जुझे फर्नांडिस यांनी आणि कार्यकारिणीने अँथनी रिबेलो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT