Indian Super League: एफसी गोवाची ग्रासरुट फुटबॉलमध्ये छाप

संघाला आयएसएल फुटबॉलमध्ये 2022-23 सालचा संयुक्त पुरस्कार
FC Goa
FC GoaDainik Gomantak

Indian Super League एफसी गोवा संघाने तळागाळातील युवा फुटबॉल विकासावर भर देताना ग्रासरूट पातळीवर छाप पाडली आहे, त्याची बक्षिसी त्यांना नुकतीच मिळाली. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलमधील 2022-23 कालावधीत सर्वोत्तम ग्रासरुट पुरस्कारासाठी एफसी गोवा आणि बंगळूर एफसीची संयुक्त निवड झाली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेल्या शनिवारी झालेल्या आयएसएल अंतिम लढतीनंतरच्या बक्षीस वितरण सोहळ्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या हस्ते एफसी गोवातर्फे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी ग्रासरुट पुरस्कार स्वीकारला.

‘‘एफसी गोवा संघ केवळ नावाजलेल्या खेळाडूंना करारबद्ध करण्यावर भर देत नाही, तर याठिकाणी खेळाडूंच्या विकास उपक्रमासही तेवढेच महत्त्व दिले जाते.

त्यामुळेच गतमोसमात या संघाशी मी मुख्य प्रशिक्षक या नात्याने करार केला. युवा खेळाडूंवर विश्वास प्रदर्शित करणे आणि त्यांच्याप्रती संयम बाळगणे अत्यावश्यक आहे,’’ असे कार्लोस पेनया म्हणाले.

FC Goa
CM Pramod Sawant: नवीन झुआरी पुलाच्या बांधकामावेळी मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना मदतीचे वाटप

एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने फोर्सा गोवा फाऊंडेशनच्या सहकार्याने लिटल गौर्स लीग सुरू केली आहे, जी देशातील फुटबॉलमधील सर्वांत मोठी बेबी लीग आहे.

यंदा या स्पर्धेचा चौथा मोसम असून 6, 8, 10 व 12 वर्षांखालील वयोगटात सुमारे हजारभर युवा फुटबॉलपटू या लीगमध्ये सहभागी असून त्यात दोनशे मुलीही आहेत.

FC Goa
G20 Meet in Goa: गोव्यातील G20 बैठकीच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; एकूण 8 बैठका होणार

युवा संघाचे यश

एफसी गोवाच्या डेव्हपलमेंट संघाने यापूर्वी गोवा प्रो-लीग, तसेच पोलिस कप पटकावला आहे. जीएफए 2022-23 मोसमात जीएफएच्या 17 वर्षांखालील संघाने बार्देश विभाग तृतीय विभागीय स्पर्धा जिंकली, तसेच 15 व 15 वर्षांखालील स्पर्धेतही उल्लेखनीय खेळ केला. 13 वर्षांखालील गटात 95, तर 15 वर्षांखालील गटात 45 गोल नोंदवून वर्चस्व राखले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com