Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘ओसीआय’बाबत निर्णय योग्य; पण... कार्लुस फेरेरा

Panaji News : ओळखपत्र विनासायास मिळू शकेल हा समज चुकीचा

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, भारतीय पासपोर्ट मागे घेण्याचे प्रमाणपत्र भारतीय वंशाचे विदेशी नागरिक (ओसीआय) हे ओळखपत्र चालू शकेल हा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असा आहे, त्याचे स्वागत आहे.

मात्र यामुळे हे ओळखपत्र विनासायास मिळू शकेल हा पसरविण्यात येत असलेला समज चुकीचा असल्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत नमूद केले.

फेरेरा यांनी यावेळी विदेशस्थ एका अल्पवयीन गोमंतकीय मुलाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, २०१५ मध्ये त्या अल्पवयीनासाठी भारतीय पासपोर्ट मिळवण्यात आला. सप्टेंबर २०१५ मध्ये त्याच्या जन्माची नोंद पोर्तुगालमध्ये करण्यात आली.

२०२० मध्ये त्याच्या भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले. डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्यासाठी पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यात आला. जन्म पोर्तुगालमध्ये नोंद झाल्याने त्या अल्पवयीनासाठी असे ओळखपत्र मिळवण्यासाठी अर्ज कऱण्यात आला. आता त्याला कारणेदाखवा नोटीस केंद्र सरकारने बजावली आहे.

वेगळ्या प्रमाणपत्राची मागणी का?

केंद्रीय गृह मंत्रालय एक गोष्ट सांगते आणि त्याच्या नेमक्या विरोधात विदेशातील वकिलाती व उच्चयुक्तालये वागतात. तेथे अशा ओळखपत्रासाठी विदेशातील नागरिकत्व घेतल्याचे प्रमाणपत्र आणायला सांगितले जाते.

केंद्र सरकार मानते की विदेशात जन्माची नोंदणी केली भारतीय नागरिकत्व जाते आणि ती व्यक्ती विदेशी नागरिक होते तर मग वेगळ्या प्रमाणपत्राची मागणी का, असा प्रश्न आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने पासपोर्ट मागे घेण्याचे प्रमाणपत्र ओसीआय कार्ड मिळवण्यासाठी चालणार हा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत असले तरी त्यामुळे ओळखपत्र विनासायास मिळेल ही माहिती चुकीची आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT